NCB google
मुंबई

NCB मुंबईच्या झोनल डायरेक्टर पदी अमित घावटेंची नियुक्ती

NCB चे मुंबई झोनल डायरेक्टरपद हा विषय मागील काही दिवसांत वादाचा विषय ठरला होता.

सकाळ डिजिटल टीम

NCB चे मुंबई झोनल डायरेक्टरपद हा विषय मागील काही दिवसांत वादाचा विषय ठरला होता.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे मुंबई झोनल डायरेक्टर पदावरुन पायउतार झाल्यानंतर आता त्या पदावर अमित गवाटे (Amit Gawate) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता एनसीबीच्या मुंबईचे नवे झोनल डायरेक्टर म्हणून अमित गवाटे यांनी सूत्र हाती घेतली आहेत. गवाटे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. समीर वानखेडे मुंबई एनसीबीतून (Mumbai NCB) गेल्यानंतर मुंबई झोनल डायरेक्टरचा (Zonal Director) अतिरिक्त पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे होता. आता या ठिकाणी अमित गवाटे यांची नेमणूक करण्यात आली आहे. NCB चे मुंबई झोनल डायरेक्टरपद हा विषय मागील काही दिवसांत वादाचा विषय ठरला होता. आता गवाटे यांच्या नियुक्तीमुळे हा वाद मिटला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवरती पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यात चांगलेच युद्ध रंगले होते. यावेळी अनेक राजकीय चर्चांना उधाण आली होती. नवाब मलिक रोज पत्रकार परिषद घेवून समीर वानखेडेंवरती गंभीर आरोप करत होते. त्यानंतर समीर वानखेडेंना मुंबईच्या झोनल डायरेक्टर पदावरुन पायउतार व्हावं लागले होते. मागच्या काही दिवसांपासून या पदाचा कारभार अतिरीक्त अधिकाऱ्यांकडे होता. मात्र आता अमित गवाटे यांच्यावर या पदाची जबाबदारी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI Report: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनो सावधान! 91% लोकांना होतोय तोटा; सेबीच्या अहवालात काय आहे?

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळाला पाहिजे; पाकिस्ताननंतर आता इस्त्रायलकडून शिफारस

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

पंढरपूर हादरलं! दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून विवाहितेनं संपवलं जीवन; पतीनंही घेतला गळफास, कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT