मुंबई

Shah-Shinde Meet : अमित शहांनी घेतली CM शिंदेंची भेट; काय झाली खलबतं?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चेची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. आजच्या पहिल्याच दिवशी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. (Amit Shah met Maharashtra CM Eknath Shinde in Mumbai due to BMC Election)

अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याला विशेष महत्व आहे कारण येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या रणनितीबाबत यावेळी चर्चा होणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणं शहांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मुंबईवर फक्त भाजपचं वर्चस्व राहिलं पाहिजे असे निर्देश दिले.

दरम्यान, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासोबत भाजप सध्या सत्तेत आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यावरही अमित शहा यांनी हल्लाबोल केला. शिवसेनेने आमच्या पाठित खंजीर खुपसला असा आरोप करत त्यांना आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे असंही त्यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना सांगितलं. त्याचबरोबर मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या युतीचं मिळून 150 नगरसेवक निवडून आणण्याचं टार्गेट देण्यात आल्याचं म्हटलं आहे.

मुंबई काबीज करण्यासाठी भाजपला शिवसेनेच्या शिंदे गटाची साथ मिळणार असल्यानंच याबाबत रणनीती ठरवण्यासाठी अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. पण या भेटीचा नेमका आणि सविस्तर तपशील अद्याप समोर आलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा ओसरला; पाऊस थांबणार, मुंबईसह घाटमाथ्यांवर इशारा

Pune Rain Update : खडकवासला धरणातून विसर्ग वाढला, मुठा नदीकाठच्या अनेक घरांत पाणी शिरले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Satara Rain : साताऱ्यात अतिवृष्टीचा तडाखा! जिल्ह्यात ८३ घरांचे नुकसान, सहा पशुधन दगावले, हवामान विभागाचा काय इशारा..

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रवास सुखकर होण्यासाठी यंत्रणा सज्ज

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव, कर्णधार श्रेयस अय्यर संतापला; म्हणाला, हे भयंकर होते...

SCROLL FOR NEXT