मुंबई

अमित शाह यांना आम्हीही भेटू शकतो- संजय राऊत

विराज भागवत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी आपल्या लेखातून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांची अहमदाबाद येथे भेट झाल्याची चर्चा रंगली. या भेटीचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी इनकार केला तर अमित शाह यांनी, 'अशा गोष्टी सार्वजनिक स्तरावर बोलायच्या नसतात', असं सांगत चर्चांना खतपाणी घातलं. या साऱ्या विविध मुद्द्यांवर संजय राऊत यांनी आज मुंबईत आपलं मत व्यक्त केलं.

"त्या भेटीत सस्पेंस ठेवण्यासारखं काय आहे? देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार यांच्यात जर भेट आणि चर्चा झाली असेल तर त्यात चुकीचं काय? एखादा मोठा नेता किंवा खासदार गृहमंत्र्यांना भेटला तर त्यात काहीही वावगं नाही. अमित शाह यांना आम्हीही भेटू शकतो. कोणीही भेटू शकतं. ते देशाचे गृहमंत्री आहेत, त्यामुळे अशा भेटींमध्ये काहीही चूक नाही", असं संजय राऊत म्हणाले.

"अमित शाह यांनी या भेटीबद्दल बोलताना सांगितलं की काही चर्चा या सार्वजनिकरित्या सांगितल्या जात नाहीत. पण मला असं वाटतं की भेट कितीही गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केली तरी कधी ना कधी बंद दाराआडच्या चर्चा सार्वजनिक होतातच. मात्र, एक लक्षात ठेवा की राजकीय बैठका या कधीही गुप्त नसतात. त्यातील चर्चा कधी ना कधी बाहेर येतातच", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

"गेल्या काही दिवसात ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे देशपातळीवर महाराष्ट्राचं नाव काहीसं खराब झालं आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही एका मुलाखतीत याबद्दल मत व्यक्त केलं आहे. मी देखील माझ्या स्तंभात अशाप्रकारचं मत व्यक्त मांडलं. महाराष्ट्राला एक प्रतिष्ठा आहे. त्यामुळे राज्याचं नाव खराब झालं हे सत्य असलं तरी असं व्हायला नको होतं म्हणून आम्ही कळकळ व्यक्त करतो आहोत. यात कोणतीही वैयक्तिक टीका नाही", असं आपल्या रोखठोक सदराबाबत राऊतांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : लग्नाची बोलणी सुरू असतानाच काळाची झडप! बँकेतील लेखापाल युवकाचा पिसाळलेला कुत्रा चावल्याने 'रेबीज'ने मृत्यू, खामगाववर शोककळा

ऑनलाईन गेम्सचा मुलांच्या मेंदूवर थेट परिणाम! नकळत कसे जाळ्यात अडकतात, वाचा धक्कादायक सत्य

Jowar Snacks: ऑफिसमध्ये काहीतरी क्रिस्पी खावंसं वाटतंय? मग डब्ब्यात ठेवा ज्वारीच्या पिठाचे 5 चविष्ट स्नॅक्स

Wife Killing case Kolhapur :अनैतिक संबंधाचा संशय; ५५ वर्षीय पत्नीची विटेने हत्या, मुलाच्या साखरपुड्याआधीच कुटुंब उद्ध्वस्त

'तारिणी' मध्ये कॉपी केला नायक सिनेमाचा ट्रॅक? प्रोमो पाहून नेटकरी म्हणतात- केदारला आता...

SCROLL FOR NEXT