मुंबई

Amit Thackeray: "निवडणुकीवेळी लपून बसता अन् स्थगितीनंतर बिळाबाहेर येता"; अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंवर थेट निशाणा

मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका अचानक रद्द केल्यानं त्याचे राज्यात मोठे पडसाद उमटले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुका अचानक रद्द केल्यानं राज्यात त्याचे मोठे पडसाद उमटले आहेत. याच विषयावरुन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. (Amit Thackeray direct target on Aditya Thackeray over stay on Mumbai University senate election)

मनविसेची भूमिका केली स्पष्ट

सिनेट निवडणुकीच्या स्थगितीनंतर अमित ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत मनविसेची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटलं की, महाराष्ट्रातील विद्यार्थी तसेच पदवीधरांसाठी खूप भयानक निर्णय आहे. पहिल्या ड्राफ्टमध्ये चुका काढल्या. त्यानंतर दुसऱ्या ड्राफ्टमध्ये देखील चुका काढून उमेदवारांना बाद केलं. त्यानंतर आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या 12 तास आधी निवडणूक थांबवण्यात आली, हे चुकीचं आहे.

याविषयावर आधी मी राज्यपालांना भेटण्याचा प्रयत्न केला पण त्यांची वेळ मिळाली नाही. तसेच विद्यापीठानं या निवडणुकीसाठी स्थगिती देऊनही फॉर्म स्वीकारले गेले. दुपारी समजलं की बकीच्यांचे फॉर्म स्वीकारले जात आहेत. निवडणुकीतून बाहेर पडायला नको म्हणून आम्ही देखील फॉर्म भरले. (Latest Marathi News)

हे लोकशाहीसाठी देखील भायानक आहे, बेकायदेशीर आहे असं याआधी कधी झालं नाही. फक्त नैसर्गिक आपत्ती दरम्यान निवडणुका रद्द करण्याची परवानगी असते, अशा शब्दांत अमित ठाकरेंनी आपला राग व्यक्त केला.

भाजपवर साधला निशाणा

बोगस मतदानाच्या पडताळणीसाठी एवढे महिने का लागतात? हवे असतील तर आणखीन काही दिवस घ्या. तुम्ही कोणाला घाबरत आहात? भीती वाटत आहे म्हणून निवडणुका पुढे ढकलणे चुकीचे नाही का? तुम्ही चुकीचे आहात म्हणून तुम्हाला निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या. पण मैदानातून पलायन कारण चुकीचं आहे. लोकसभा, विधानसभा कधी पुढे ढकला जर त्या पुढे ढकलल्या तर लोक रस्त्यावर उतरतील, अशा शब्दांत अमित ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. (Marathi Tajya Batmya)

राहुल कनाल यांच्यावर निशाणा

निवडणुकीला हे लपून बसतात. शिवसेनेच्या उमेदवारांना सांग त्यांनी त्यांची कामं सांगावीत. त्यांनी आधी सगळं उघड करावं मग बघू. पुढच्या वर्षी निर्णय राज साहेबांच्या बाजूने लागेल, असा विश्वासही यावेळी अमित ठाकरेंनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

IPL 2026: Umpire चा दुजाभाव? मुंबई अन् दिल्लीला वेगवेगळा नियम? हार्दिकच्या ग्लव्ह्ज बदलीमुळे होतायेत आरोप

पगार २५ हजार सांगून १५ हजारच देतात, २५० रुपये वाढ देऊन उपकार केल्याचं दाखवतात; कंपन्यांकडून लूट, कर्मचाऱ्यांचा संताप

Oil Supply Explainer: हॉर्मुज सामुद्रधुनी उघडली तरी पेट्रोल-डिझेल, LPG गॅसच संकट कायम! नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT