मुंबई

कोरोनाने मृत्यू ओढवलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना पंधरा कोटी दहा लाख रुपयांचे वाटप

सकाळवृत्तसेवा

मुंबई: राज्यात कोरोनाशी लढताना मृत्यू झालेल्या मुंबई पोलिस दलातील पोलिस  अधिकारी आणि कर्मचा-या कुटुंबियांना आतापर्यंत पंधरा कोटी दहा लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यात 31 पोलिसांचा समावेश असून यातील 24 पोलिसांना राज्य सरकारकडुन प्रत्येकी 50 लाख रुपये असे 12 कोटी रुपये तर 31 पोलिसांना मुंबई पोलिस फाऊंडेशनकडून प्रत्येकी दहा लाख रुपये असे 3 कोटी 10 लाख रुपये देण्यात आल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

उर्वरित मृत पोलिसांच्या कुटुंबियांना लवकरच सानुग्रह आणि नुकसानभरपाई म्हणून साठ लाख रुपये देण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसात मुंबई शहरात करोनाचा कहर वाढत असून त्याचा सर्वाधिक फटका मुंबई पोलिसांना बसला आहे. गेल्या तीन महिन्यांत मुंबई पोलिस दलातील 36 पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांचा करोनामुळे मृत्यू झाला तर सुमारे अडीच हजार पोलिस करोनाबाधित झाले आहेत. तरीही कर्तव्यात कुठलाही कसूर न ठेवता पोलिसांचा करोनाविरुद्ध् लढा सुरुच आहे.

पोलिस मुख्यालयातर्फे पोलिस कल्याण विभाग, विविध सामाजिक संस्था, फार्मास्टिकल कंपन्या, वित्तीय संस्थेकडून पोलिस दलासाठी 47 हजार 340 लिटर सॅनिटायझर, दोन लाख 17 हजार डिस्पोजेबल आणि कापडी मास्क, पंधरा हजार सर्जिकल हॅण्ड गोल्व्हज, सोळाशे फ्लास्क रेनसूट, शंभरहून वॉटर डिस्पेन्सर मशीन, सहा हजार पीपीई, दोन हजार गॉगल, तेरा हजार फेस शिल्ड, 24 ऍक्रेलिक शिट, नाकाबंदीसाठी 13 हजार 534 पाण्याचा बाटल्या, शरीरातील ऑक्सिजन मोजण्यासाठी 247 पल्स ऑक्सिमीटर मापक यंत्र, 952 स्मार्ट वॉच, 160 टेंपरेचर गन, 137 सॅनिटायझर डिस्पेन्सर स्टॅण्ड, कालिना, मरोळ आणि पोलिस जिमखानासाठी सात हजार हायजीन किट असे सुमारे साडेसात कोटी रुपयांचे औषधांसह इतर पुरविण्यात येतंय.

पोलिसांसाठी खास हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. पोलिसांसाठी सुरू केलेल्या हेल्पलाईनवर दोन हजार 213 पोलिसांनी संपर्क साधला असून एक हजार 633 पोलिसांना कोव्हीड सेंटरसह विविध रुग्णालयांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. शहरात विविध ठिकाणी कोव्हीड सेंटर उभारण्यात आले आहे. कलिना येथील पहिल्या इमारतीमध्ये 275, दुस-या इमारतीमध्ये 150, मरोळ येथे 256 तर पोलिस जिमखाना येथे 46 बेड असे एकूण 726 पोलिसांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटरमधील बाधित पोलिसांसाठी सात हजार हायजीन किटचे वाटप करण्यात आले आहे.

करोनाविषयी शंका उत्पन्न होत असल्याने महानगरपालिकेकडून ताप तपासणी केंद्र सुरु करण्यात आले असून आताापर्यंत एक हजार 757 तपासण्या झाल्या आहेत तर 381 पोलिसांचे स्वॅब घेण्यात आले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT