मुंबई

पनवेलच्या पाणीटंचाईवर अमृत योजनेचा उतारा; कंत्राटदार निवडीला मान्यता

दीपक घरत


पनवेल : महापालिका क्षेत्रात पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेच्या कामासाठी कंत्राटदार निवडीला मंजुरी देण्यात आली असून काही महिन्यांत कामाला सुरवात होण्याची शक्‍यता आहे. 

पनवेल महापालिका हद्दीत दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. ती दूर करण्यासाठी 408 कोटींची अमृत पाणीपुरवठा योजना महापालिकेने आखली आहे. मात्र मागील चार वर्षांपासून तांत्रिक अडचणीत ती अडकली होती. या संदर्भात भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर यांनी वेळोवेळी लक्ष वेधले तसेच पाठपुरावाही केला होता. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख व विद्यमान आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सचिवालयात हा विषय मांडला. या सर्व प्रयत्नांना यश येऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नस्तीला गती मिळाली आहे. या कामाचा कालावधी 30 महिन्यांचा आहे. जेव्हीपीआर ही कंपनी 247 कोटी रुपयांची विविध कामे पुढील महिन्यापासून सुरू करणार आहे. 

असे मिळेल पाणी 
पनवेलच्या पाणीपुरवठा योजनेमुळे 228 दशलक्ष लिटर पाण्याची उपलब्धता पाताळगंगा नदीतून पनवेलला होणार आहे. योजना पूर्णत्वास आल्यानंतर पनवेल महापालिकेला यातील 100 एमएलडी, एमएमआरडीए क्षेत्राला 19, जेएनपीटी बंदराला 40, तर सिडको वसाहतींना 69 एमएलडी पाणी मिळणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने महापालिका व इतर प्राधिकरणांसोबत करार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 
Amrut Yojana in Panvel Recognition of contractor selection 

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT