Aryan Khan Amruta Fadnavis 
मुंबई

आर्यन खान प्रकरणावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या..

आर्यनचा अमलीपदार्थ विक्रेते आणि पुरवठादारांशी संबंध होता, असं विशेष न्यायालयाचे नमूद केलं.

स्वाती वेमूल

आर्यनचा अमलीपदार्थ विक्रेते आणि पुरवठादारांशी संबंध होता, असं विशेष न्यायालयाचे नमूद केलं.

Aryan Khan Case: क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने बुधवारी फेटाळला. आर्यनचा अमलीपदार्थ विक्रेते आणि पुरवठादारांशी संबंध होता, असे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी नमूद केलं. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस Amruta Fadnavis यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राने प्रगतीपथावर पुढे जावं की ड्रग्ज कॅपिटल बनावं हे आपल्यालाच ठरवावं लागणार आहे, असं त्या म्हणाल्या. त्याचप्रमाणे ड्रग्जच्या नेटवर्कचा तपास झाला पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

"महाराष्ट्राने प्रगतीपथावर पुढे जावं की ड्रग्ज कॅपिटल बनावं हे आपल्याला ठरवावं लागणार आहे. ड्रग्जच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईला तुरुंगात डांबावं असं मला वाटत नाही. पण त्यांना त्या विळख्यातून बाहेर काढायला नको का? त्यांना ड्रग्ज कुठून पुरवलं जातं, त्याचं नेटवर्क काय आहे, या तपास झालाच पाहिजे. त्यानंतर या मुलांचं समुपदेशन करण्याची आणि त्यांना सुधारगृहात ठेवण्याची गरज असते", अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.

न्यायालयाने आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगचा दाखला दिला. आर्यन आणि अन्य दोन आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी गंभीर आहे. त्यामुळे जामिनावर असताना तो अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही हे म्हणता येऊ शकत नाही, शिवाय एनसीबीने प्रकरणाशी संबंधित सादर केलेली कागदपत्रे आणि आर्यन, अरबाज यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वेच्छेने दिलेल्या जबाबानुसार त्यांनी सेवनासाठी ड्रग्ज बाळगल्याचं कबूल केलं होतं. यावरून अरबाजच्या बुटातून हस्तगत केलेल्या ड्रग्जबाबत त्याला माहिती होती हेच स्पष्ट होतं. या बाबी लक्षात घेता आरोपींना जामीन देता य़ेणार नसल्याचं न्यायालयाने म्हटलं. विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर आर्यनच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT