dog
dog sakal media
मुंबई

कुत्र्याच्या मृत्यूनंतर पती-पत्नीने संपवलं जीवन, नालासोपाऱ्यातील घटना

नरेश शेंडे

मुंबई : येथील नालासोपाऱ्यात मन हेलावून टाकणारी हृदयद्रावक घटना घडली आहे. कौटुबिंक ताणतणाव, प्रेमप्रकरण,मानसिक तणाव,आर्थिक कर्ज तसेच गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, मुंबईच्या नालासोपाऱ्यात (Nalasopara Strange Incident) काहीसं वेगळं घडलंय. माणसांप्रमाणेच घरातील पाळीव प्राण्यांवरही (Pet Animals) काही लोक जीवापाड प्रेम करतात. त्यांच्या अचानक मृत्यूने अख्ख्या कुटुंबावर दु:खाचं डोंगर कोसळतो. अशीच एक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. पाळीव श्वानाच्या (Dog Death) निधनाच्या दु:खात असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याने गळफास लावून आत्महत्या (Elderly Couple Suicide) केली आहे. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये दोघा नवरा बायकोने कोविड आजारावर मात केली होती. विजय कदम (60),जयश्री कदम (55) असं या दाम्पत्याचं नाव आहे. ही घटना नालासोपाऱ्यातील गणेश नगरमध्ये मंगळवारी घडली. या घटनेचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले आहे. (An elderly couple suicide may pet dog dies incident sadness)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश नगर सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना दाम्पत्य राहत असेलेल्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे कळले. सोसायटीतील नागरिकांनी यांसंबंधी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी रुममध्ये प्रवेश केल्यावर दोघांचेही मृतदेह सापडले. त्यानंतर त्यांचे मृतदेह शवविच्छदनासाठी पाठविण्यात आले. यावेळी घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाहीय.या दाम्पत्याने सोमवारी स्वत:ला संपवले असेल. अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

एप्रिल महिन्यात दोघेही नवरा बायको कोविड पॅाझिटिव्ह होते. त्यानंतर त्यांना गृहविलगीरकरणात ठेवण्यात आले होते. त्यावेळी सोसायटीतील नागरिकांनी या दोघांना जीवनावश्यक किराणा सामान दिले होते. असं सोसायटीतील नागरिकांनी पोलिसांना सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT