ancient cave found at Karnala fort in Panvel in Raigad district marathi news  
मुंबई

Karnala Fort : कर्नाळा किल्ल्यावर आढळले प्राचीन भुयार! ऐतिहासिक ठेवा आला समोर

रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील प्रसिद्ध कर्नाळा किल्ल्यावर रविवारी (ता. 16) प्राचीन भुयार/गुंफा आढळली आहे.

अमित गवळे

पाली : रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील प्रसिद्ध कर्नाळा किल्ल्यावर रविवारी (ता. 16) प्राचीन भुयार/गुंफा आढळली आहे. यामुळे किल्ल्यावरील ऐतिहासिक ठेवा समोर आला आहे. दुर्ग अभ्यासक व सह्याद्री प्रतिष्ठान सदस्य गणेश रघुविर व सह्याद्री प्रतिष्ठान पनवेलचे सदस्य मयूर टकले यांनी ही मोहीम आखून भुयाराचा शोध घेतला.

किल्ल्यावर हे नव्याने तिसरे भुयार निदर्शनास आले आहे. ते भुयार क्रमांक 2 च्या पुढे ८० फुटावर कातळाच्या कडेला आहे. हे भुयार ८०% मातीने बुजले असून याचे तोंड २.५ लांब व १.५ फुट एवढे रुंद असून आतमध्ये साधारण १० फुट एवढे आहे. यातील मातीचा गाळ काढल्यावर याचा मूळ आकार निदर्शन येईल. सदर भुयारासमोर मोठे गवत व झडपे आहेत. या वस्तूचे अक्षांस आणि रेखांश व जीपीएस लोकेशन नोंद करण्यात आले आहे. हि भुयारे किल्ल्याच्या प्राचीन कालखंडातील दुर्ग अवशेषांच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत. यावरून किल्ल्याची निर्मिती हि प्राचीन कालखंडात झालेली आढळते. तसेच लवकरच किल्ल्याच्या परिसरातील/ घेरऱ्यातील पुरावषेशांची माहिती मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील. असे गणेश रघुविर आणि मयूर टकले यांनी सकाळला सांगितले.

किल्ल्याच्या प्राचीन व मध्ययुगीन कालखंडातील स्थापत्याच्या खुणा

किल्याच्या भौगोलिक आणि लष्करी दृष्ट्या संरक्षणाच्या उद्देशाने विविध कालखंडात किल्ल्यावर बांधकामे व त्यांची डागडुजी झाली असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्राचीन व मध्ययुगीन कालखंडातील स्थापत्याच्या खुणा आजही निदर्शनास येतात. डोंगराचे कडे तासून त्यावर केलेले बांधकाम, खडकात खोदलेल्या मोठ्या प्रमाणातील टाके,कोठारे, वाड्याची इमारत, घरांची जोती, चौकी मेट,शरभ शिल्प, अश्या वास्तूंचे अवशेष आजही आहेत. शिलालेख हे किल्ल्यावरील बांधकाम व त्याकाळातील राजवट या बद्दलची माहिती देते. त्यामुळे या किल्ल्याचे विविध कालखंडात फार महत्व होते असे निदर्शनास येते. किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहता सातवाहन,पोर्तुगीज,गुजरात सुलतान, देवगिरी यादव, आदिलशहा,निजामशहा,मराठे आणि इंग्रज या राजवटीं इथे होऊन गेलेल्या आहेत. त्यानंतर आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वास्तव ही या किल्याला लाभले आहे.

आधीची 2 भुयारे

किल्ल्याच्या घेऱ्यात असलेल्या पायथ्या जवळील कल्हे गावातून अर्धातास उंचीवरील कड्यात एक कोरीव भुयार आहे तर किल्यावर एल आकारची दोन कोरीव भुयारे आहेत. त्यांना स्थानिक पाण्याची टाके असे म्हणतात.

भुयार क्रमांक 1 पहिल्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला एक पायवाट जाते त्याने दोन मिनिटे चालत गेले, असता कातळात खोदलेले कोरीव भुयार दिसते. हे एल आकाराचे आहे. याचे तोंड ३X३ एवढे असून ६ फुट खोल व तळाशी ३X३ आकारचे तोंड असून ते १० फुट लांबीचे कोरलेले आहे.

भुयार क्रमांक 2 किल्ल्यावरील कर्णाई देवी मंदिरा समोर पत्राच्या शेडच्या उजव्या बाजूला एक मोठा घराच्या जोत्याचा चौथरा आहे. त्यावरून डाव्या बाजूने कडे कडेने गेले असता तेथे कातळात खोदलेले एक भुयार आहे. स्थानिक लोक त्याला पाण्याची टाकी संबोधतात पण ती पाण्याची टाकी नसून ते एल आकाराचे भुयार आहे. त्याचे तोंड हे २.५ X२.५ आकाराचा चौकोनी भाग असून हा साधारण ६.३ फुट एवढा खोल असून त्याच्या तळाशी २ X२ फुट आकाराचा चोकोनी भाग कोरला असून आत ८ ते १० फुट लांब एवढा कोरीव भाग आहे.

किल्ल्याला माथ्यावर /बालेकिल्यावर असलेला सुळका हा या किल्याचे वैशिष्ट्य असून मुंबई गोवा महामार्गावरून तो आपले लक्ष वेधून घेतो. कर्नाळा पक्षी अभयारण्य यामुळे किल्ल्याच्या परिसरातील जंगल हे वन विभाग अंतर्गत संरक्षित केले गेलेले आहे. वन विभागाने पक्षी अभयारण्य व पर्यटकांच्या सोयीसुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिल्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump-Putin alaska meeting: ट्रम्प-पुतिन भेट अमेरिका सोडून अलास्कामध्येच का? गुप्त भेटीच्या केंद्रस्थानी भारत

Nicholas Saldanha Died: महाराष्ट्राचे दिग्गज क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Politics: व्होटचोरी विरोधातील आंदोलन दडपल्या प्रकरणी कारवाई कराच, काँग्रेसची मागणी

Police officer kicking protester VIDEO: …अन् पोलिस अधिकाऱ्याने फिल्मी स्टाईलने 'त्या' आंदोलकाच्या कंबरेत घातली लाथ ; व्हिडिओ व्हायरल !

Local Megablock: प्रवाशांनी खबरदारी घ्या! मुंबई लोकलच्या मार्गावर रात्र आणि दिवसाचा मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT