Mumbai sakal
मुंबई

अंधेरीतील हॉटेलमध्ये चोरी करणार्‍या नोकराला अटक

आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकाने नाशिक येथून अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - अंधेरीतील एका नामांकित हॉटेलमध्ये चोरी करणार्‍या नोकराला सहा महिन्यानंतर आंबोली पोलिसांच्या एका विशेष पथकाने नाशिक येथून अटक केली. ऋषिकेश कल्याणसिंग शिसोदे असे २६ वर्षीय आरोपीचे नाव असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. ऋषिकेश हा मूळचा जळगावच्या चाळीसगाव, कुंजरचा रहिवाशी आहे.

फेब्रुवारी महिन्यांत तो अंधेरीतील एका हॉटेलमध्ये हाऊसकिपर म्हणून कामाला लागला होता. एक महिना काम केल्यानंतर तो अचानक हॉटेलमधून निघून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने मॅनेजरसह मालकांना सांगितला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने मॅनेजर नरेशकुमार खंडका यांनी हॉटेलमध्ये जाऊन त्याची चौकशी सुरु केली होती. याच दरम्यान त्यांना कॅश काऊंटरमधील ४० हजार रुपयांची कॅश, लॅपटॉप आणि विदेशी दारु असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. हॉटेलमधील सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर ऋषिकेशनेच ही चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी आंबोली पोलीस ठाण्यात ऋषिकेशविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असतानाच ऋषिकेश हा नाशिक येथील रेड चिल्ली हॉटेलमध्ये काम करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमेश्‍वर कामठे यांच्या पथकातील एपीआय अतुल सानप, पोलीस हवालदार पवार, ढेमरे यांनी त्याला सहा महिन्यानंतर नाशिक येथून अटक केली. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

रागात पाहिल्याने छातीवर सपासप वार..., मुंबईत गणेशोत्सवात रक्तरंजित थरार; 7 जणांकडून मंडळाच्या अध्यक्षाची हत्या

World Alzheimer Day 2026: साठी ओलांडलीय? मग अल्झायमरची ‘ही’ लक्षणं तुम्हाला माहित असायलाच हवीत!

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT