anil deshmukh sakal media
मुंबई

देशमुखांविरोधातील खटल्याच्या कारवाईला सुरूवात

ईडीच्या चौकशीस हजर न राहिल्याने न्यायालयाकडून समन्स

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे (corruption allegations) अडचणीत आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात आता महानगर दंडाधिकारी न्यायालयाने (court) आज समन्स (summons) जारी केले. वारंवार समन्स बजावूनही ईडीच्या चौकशीला हजर न झाल्याबद्दल त्यांच्याविरोधातील खटल्याच्या कारवाईला न्यायालयाने सुरुवात केली आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत भर पडली आहे.

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि खंडणी वसुलीचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच ईडीनेही चौकशी सुरू केली असून आतापर्यंत देशमुख यांना पाचवेळा समन्स बजावले आहे. परंतु देशमुख यांनी एकदाही चौकशीला हजेरी लावली नाही. त्यामुळे आता ईडीने देशमुख यांच्याविरोधात दंडाधिकारी न्यायालयात दावा दाखल केला आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर. एम. नेरळीकर यांनी शुक्रवारी या दाव्याची दखल घेऊन खटल्याच्या कारवाईला सुरुवात केली. देशमुख यांना १६ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स जारी केले.

भादवि कलम १७४ नुसार सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करुन अडथळा आणणे, असा आरोप ईडीने देशमुख यांच्यावर ठेवला आहे. देशमुख यांना २०, २८ जून, २, ३० जुलै आणि १६ ऑगस्ट असे एकूण पाच समन्स बजावले आहेत. पण एकाही समन्सची त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे देशमुखांविरोधात दावा दाखल केल्याचे ईडीच्या वतीने ॲड. श्रीराम शिरसाट आणि ॲड. अरविंद आघाव यांनी न्यायालयात सांगितले. या कलमानुसार एक महिना कारावास किंवा पाचशे रुपये दंड अथवा दोन्ही अशी शिक्षेची तरतूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT