Anil Deshmukh 
मुंबई

"पैसे खाल्ले तेव्हा नव्हता कोरोना?"; अनिल देशमुखांना सवाल

"पैसे खाल्ले तेव्हा नव्हता कोरोना?"; अनिल देशमुखांना सवाल ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाण्यास कोरोनाचे कारण देत देशमुखांचा नकार Anil Deshmukh request ED Officials to record statement on audio visual mode because of Coronavirus Anjali Damania slams the reason

विराज भागवत

ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाण्यास कोरोनाचे कारण देत देशमुखांचा नकार

मुंबई: 'ईडी'ने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना १०० कोटींच्या खंडणी वसुली (100 Crores Extortion Case) प्रकरणाच्या चौकशीसाठी समन्स (Summons) बजावले. शनिवारी देशमुख यांनी वेळ मागितल्यामुळे त्यांना आज (मंगळवारी) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण आजदेखील अनिल देशमुख ईडी (Enforcement Directorate) कार्यालयात चौकशीसाठी (Inquiry) हजर झाले नाहीत. त्यांनी ईडीला पत्र (Letter) लिहून, त्यांची चौकशी किंवा जबाब (Statement) हा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या (Video Conferencing) माध्यमातून नोंदवून घ्यावा अशी विनंती केली. तपासादरम्यान मी अनेकांच्या संपर्कात आल्याचे सांगून कोरोनाचे कारण देत त्यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाणे टाळले. याच मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनिल देशमुखांना सवाल केला. (Anil Deshmukh request ED Officials to record statement on audio visual mode because of Coronavirus Anjali Damania slams the reason)

"आता अनिल देशमुखांना कोरोना आठवतो? पैसे खाल्ले तेव्हा नव्हता कोरोना? ED ने बिलकुल अपवाद करू नये. Law should be same for everyone. उद्या सगळेच म्हणतील आम्ही घरून उत्तर देऊ. मग काय अर्थ यंत्रणेचा? बीजेपी ची ही चाल आहे, पण तुमचे हाथ देखील बरबटलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही", अशा शब्दांत अंजली दमानिया यांनी आपलं मत रोखठोक शब्दात व्यक्त केलं.

Anjali Damania

अनिल देशमुखांनी विनंती पत्रात म्हंटलंय...

माझी २५ जूनला दीर्घ काळ चौकशी झाली आहे. माझं वय ७२ वर्षे आहे. मला अनेक शारीरिक व्याधी आहेत. कोमॉर्बिलीटीमुळे मला काळजी घेणं गरजेचं आहे. तपासा दरम्यान मी अनेकांच्या संपर्कातही आलो आहे. त्यामुळे मी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. त्या अनुषंगाने मी चौकशीसाठी स्वत: हजर राहू शकत नाही. मी माझ्या वकिलांना अधिकृत प्रतिनिधी म्हणून पाठवत आहे. गरज भासल्यास मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीला हजर राहण्यास तयार आहे. आपणास जी वेळ योग्य वाटेल, त्या वेळेस मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चौकशीला सामोरे येण्यास तयार आहे, असे अनिल देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : रेपणपल्लीच्या जंगलात एसटी बस पडली बंद; 40 प्रवाशांवर रस्त्यावर रात्र काढण्याची वेळ

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT