Anil-Deshmukh 
मुंबई

अनिल देशमुख आजही ईडी कार्यालयात चौकशीसाठी 'गैरजहर'!

अनिल देशमुख आजही ईडी कार्यालयात चौकशीसाठी 'गैरजहर'! 'तपासा दरम्यान मी अनेकांच्या संपर्कात आलो आहे...'; अनिल देशमुखांचे ED ला पत्र Anil Deshmukh request ED Officials to record statement on audio visual mode regarding 100 crores Extortion Case

विराज भागवत

'तपासा दरम्यान मी अनेकांच्या संपर्कात आलो आहे...'; अनिल देशमुखांचे ED ला पत्र

मुंबई: 'ईडी'ने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना १०० कोटींच्या खंडणी वसुली (100 Crores Extortion Case) प्रकरणाच्या चौकशीसाठी समन्स (Summons) बजावले. रविवारी देशमुख यांनी वेळ मागितल्यामुळे त्यांना आज (मंगळवारी) हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. पण आजदेखील अनिल देशमुख ईडी (Enforcement Directorate) कार्यालयात चौकशीसाठी (Inquiry) हजर झाले नाहीत. त्यांनी ईडीला पत्र (Letter) लिहून, त्यांची चौकशी किंवा जबाब (Statement) हा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या (Video Conferencing) माध्यमातून नोंदवून घ्यावा अशी विनंती केली. (Anil Deshmukh request ED Officials to record statement on audio visual mode regarding 100 crores Extortion Case)

मंगळवारी काय घडलं...

'ईडी'ने अनिल देशमुख यांना सकाळी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. पण अनिल देशमुख यांच्या शारीरिक व्याधी लक्षात घेता त्यांनी चौकशीसाठी येण्यास दिला नकार दिल्याचे वकिलांनी सांगितले. तसेच, गुन्ह्यांसदर्भातील FIRची प्रत देण्यात यावी, अशी मागणी वकिलांनी 'ईडी'कडे केली. "आम्ही ईडीच्या कार्यालयात जात आहोत. नक्की काय काय मुद्दे आहेत ते त्यांना आम्ही विचारू. मग आम्ही अनिल देशमुखांशी चर्चा करू आणि पुढे काय करायचं ते ठरवू", असे सांगत अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग हे ईडी कार्याल्याकडे रवाना झाले.

अनिल देशमुखांचे ईडी ला पत्र

अनिल देशमुखांच्या पत्रात काय म्हंटलंय?

माझी २५ जूनला दीर्घ काळ चौकशी झाली आहे. माझं वय ७२ वर्षे आहे. मला अनेक शारीरिक व्याधी आहेत. कोमॉर्बिलीटीमुळे मला काळजी घेणं गरजेचं आहे. तपासा दरम्यान मी अनेकांच्या संपर्कातही आलो आहे. त्यामुळे मी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. त्या अनुषंगाने मी चौकशीसाठी स्वत: हजर राहू शकत नाही. मी माझ्या वकिलांना अधिकृत प्रतिनिधी म्हणून पाठवत आहे. गरज भासल्यास मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीला हजर राहण्यास तयार आहे. आपणास जी वेळ योग्य वाटेल, त्या वेळेस मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चौकशीला सामोरे येण्यास तयार आहे, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT