Anil parab Sakal Media
मुंबई

'हिम्मत असेल तर..' सोमय्या दापोलीत पोहोचण्याआधीच अनिल परब संतापले

ओमकार वाबळे

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांच्या अनधिकृत रिसॉर्टविरोधात मोहीम उघडल्याचं चित्र आहे. सोमय्यांनी मागील आठवड्यातच ते दापोलीत रिसॉर्ट तोडायला जाणार असल्याची घोषणा केली. (Kirrit Somaiya Alleges Anil Parab over Illegal Resort)

यासाठी त्यांनी प्रतिकात्मक हातोडा देखील बनवला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत बांधण्यात आलेले रिसॉर्ट अनिल परब यांच्या मालकीचे आहेत. तसेच ते अनधिकृतपणे बांधण्यात आल्याचा आरोप सोय्यांनी केला होता. यानंतर सोमय्या थेट कोकणाच्या वाटेवर आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले आहेत.

दरम्यान, या प्रकरणावर आता अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. संबंधित रिसॉर्ट माझं नसल्याचं त्यांनी म्हटलंय. यासंबंधी ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे, असं ते म्हणाले.

काय म्हणाले परब?

  • किरीट सोमय्या वातावरण खराब करत आहेत

  • रिसॉर्टवर ज्यांना रोजगार मिळतोय ते भयभीत झालेत

  • त्या कामगारांनी पोलिसांत तक्रार केली आहे

  • मी पुन्हा आता हायकोर्टात जाणार आहे

  • कारण माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत

  • हिंमत असेल तर तोडून दाखवा, ते फक्त नौटंकी करत आहेत

अनिल परब यांचे मुद्दाम नाव घेऊन सोमय्या वातवरण खराब करत आहेत. कोकणात ज्यांचे पाण्यात बंगले आहेत, त्यांच्यावर पण कारवाई करावी, असं त्यांनी म्हटलं.

किरीट सोमय्या नौटंकी करत आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते वातावरण खराब करत आहेत. ग्रामस्थांचा मला देखील फोन आला, आम्ही विरोध करू. पण मी म्हणालो, तो तुमचा प्रश्न आहे. जर त्यांच्या व्यवसायावर किरीट सोमय्या जात असतील तर ते विरोध करणारच ना?, असा प्रश्न परबांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मानरच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Kalyan Dombivli Elections: कल्याण डोंबिवलीत ठाकरे एकजुटीचे राजकीय संकेत; महापालिका रणधुमाळीपूर्वी हालचालींना वेग

Ambani gifts Lionel Messi : अनंत अंबानींकडून मेस्सीला 11 कोटींचं घड्याळ भेट! एवढं महाग का आहे Richard Mille घडयाळ? काय आहे खास?

Germany Jobs: ‘मेड इन महाराष्ट्र’ मनुष्यबळाला जर्मनीचे दरवाजे बंद? १० हजार तरुणांचे भविष्य टांगणीला

Nashik Marathi Vishwa Sammelan : नाशिकमधील 'मराठी विश्व संमेलन' लांबणीवर; जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत रंगणार सोहळा!

SCROLL FOR NEXT