shidore
shidore 
मुंबई

हिंदी आमची राष्ट्रभाषा नाही, मनसेच्या अनिल शिदोरेंचे ट्विट

मिलिंद तांबे

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे..."हिंदी आमची राष्ट्रभाषा नाही. उगाच ती लादून आमची माथी भडकावू नका.." अस ट्विट मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी केलं आहे. यावरून मनसे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक होणार असल्याच स्पष्ट झालं आहे.

लोकसभा निवडणुक न लढवणारे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. सध्या ते पुण्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठक घेत आहेत. विधानसभा निवडणुकीत मनसेची नेमकी रणनीती काय असावी याचा आढावा राज घेत आहेत. त्यातच अनिल शिदोरे यांनी हे ट्विट केल्याने मनसे मराठीच्या मुद्यावर पुन्हा आक्रमक होणार हे स्पष्ट झालं आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजप विरोधात रान उठवलं होतं. मात्र राज यांच्या सभांचा परिणाम भाजपवर झाला नाही.यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसेला आपला "प्रचार पॅटर्न" बदलावा लागणार आहे. याचीच चाचपणी राज ठाकरे करत आहेत. विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी-अमित शहा विरोध हा एकमेव मुद्दा चालणार नसल्याने राज पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्याला हात घालतील अशी शक्यता आहे.

केंद्रात शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याचा हालचाली सुरू आहेत.या सक्तीला आमचा विरोध आहे.हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन विरोध करावा.
- अनिल शिदोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT