lion sakal media
मुंबई

प्राण्यांचा राजा येणार कधी? कोविडमुळे सिंहाचे आगमन लांबणीवर

- समीर सुर्वे

मुंबई : भायखळा (byculla) येथील विरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयातील (byculla zoo) सिंहाचे आगमन कोविडमुळे (Corona) लांबले आहे. सिंहाच्या बदल्यात झेब्रा द्यायचा आहे. मात्र,परदेशातून हा झेब्रा ( Zebra) आणण्याची परवानगी कोविडमुळे मिळत नाही. त्यामुळे सिंहाचे आगमन लांबले आहे. (Animal like lion and zebra on waiting in byculla zoo due to corona issue-nss91)

महानगर पालिका गुजरात मधील सक्कर बाग प्राणीसंग्रहाल आणि इंदोर प्राणीसंग्रहालयातून मुंबईत दोन सिंहाच्या जोड्या आणण्यात येणार आहे.त्यासाठी या प्राणीसंग्रहालयाला झेब्राची जोडी द्यायची आहे.झेब्राच्या दोन जोड पालिका इस्त्राईल मधून विकत घेणार आहे.त्यासाठी महानगर पालिकेची परवानगी मिळाली आहे.अंतिम मंजूरीसाठी हा प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला तीन महिन्यांपुर्वी पाठविण्यात आला आहे.

मात्र,अद्याप परवानगी मिळालेली नाही. "झेब्राची जोडी आणण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाला पाठविण्यात आला आहे.असे प्राणीसंग्रहालयाचे अधिक्षक डॉ.संजय त्रिपाठी यांनी सांगितले. कोविडमुळे सध्या जगभरात प्राण्याची देवाण घेवाण थांबली आहे.त्यामुळे परदेशातून प्राणी आणणे सध्यातरी शक्‍य नाही.असेही पालिकेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.पालिकेने काही वर्षांपुर्वी पेंग्विन परदेशातून आणले होते.तर,कोविड सुरु होण्यापुर्वी औरंगाबाद मधून पट्टेधारी वाघ मुंबईत दाखल झाला होता.

सर्वच परदेशी पाहूण्याचे आगमन लांबणार ?

राणीच्या बागेत परदेशातून पांढरा सिंह,जिराफ,चित्ता,जॅग्वार तसेच अनेक परदेशी प्राणी आणण्यात येणार आहे.मात्र,आता कोविड मुळे या सर्वच प्राण्याचे आगमन लांबण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.कोविड काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राण्याची देवाणघेवाण थांबविण्यात आली आहे.त्यामुळे या प्राण्याचेही आगमन लांबण्याची शक्‍यता आहे.परदेशी पाहूण्यासाठी राणीच्या बागेला लागून असलेल्या 10 एकरच्या भुखंडावर विस्तार करण्यात येणार आहे.या ठिकाणी परदेशातील प्राणी ठेवण्यात येणार आहे.मात्र,याकामावरही कोविडचा परीणाम झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT