मुंबई

मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदार संघाचा निकाल जाहीर

सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 नुसार, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील (SENATE) 10 नोंदणीकृत पदवीधर संघाचे निकाल आज जाहीर झाले. या दहा जागांवर युवासेनेने दणदणीत विजय मिळवला. यामध्ये 5 जागांसाठी खुल्या प्रवर्गातून महादेव जगताप, प्रदीप सावंत, प्रवीण पाटकर, सुप्रिया करंडे आणि मिलिंद साटम हे उमेदवार विजयी झाले.

तर राखीव प्रवर्गातील निवडणूकीतून अनुसूचित जाती या प्रवर्गातून निखिल जाधव, अनुसूचित जमाती प्रवर्गातून धनराज कोहचाडे, विजा/ भज (DT/NT) प्रवर्गातून शशिकांत झोरे, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून राजन कोळंबेकर आणि महिला प्रवर्गातून शितल शेठ देवरुखकर हे उमेदवार निवडून आले.

नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या दहा जागांसाठी एकूण 68 उमेदवार निवडणूकीसाठी होते. 25 मार्च 2018 रोजी एकूण 53 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले होते. या 10 जागांच्या निकालासाठी दिनांक 27 मार्च 2018 पासून मतमोजणीला सुरुवात झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT