मुंबई

#COVID19 : मुंबई आणि ठाण्यात आणखी एक रुग्ण! 

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महामुंबईतील कोरोना बाधितांची संख्या चार झाली असून राज्यातील रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे. गुरुवारी (ता. 12) आढळलेली कोरोनाबाधित 64 वर्षांची व्यक्ती असून ती दुबई येथून मुंबईत आली होती; तर फ्रान्सहून ठाण्यात आलेल्या एका व्यक्तीलाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

मुंबईत बुधवारी (ता. 11) कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. यासाठी वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांत या पथकाकडून 106 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले; मात्र त्यात एकाही व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळळी नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले. यापूर्वी ज्या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, त्यांच्या परिसरातील नागरिकांचा पालिकेने शोध घेतला असून बाधितांच्या घरातील तीन लोकांचे त्यांच्या घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. 

18 जानेवारीपासून गुरुवारपर्यंत मुंबई विमानतळावर एक लाख 96 हजार 762 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 190 संशयित प्रवाशांना कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 168 प्रवासी कोरोनाबाधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे; तर 20 जणांचा अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत 652 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांना 14 दिवस निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. 

बाधितांचे निकटवर्तीयही रुग्णालयात 
मुंबईत काल आढळलेल्या दोन कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. यातील तीन जणांना पालिकेच्या कस्तुरबा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तपासणी सुरू आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या सोयीसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून "1916' या क्रमांकावर ती 24 तास सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर ठाणे येथील रुग्णाच्या कुटूंबियांनादेखिल कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
--- 
ठाण्यात 34 जण निगराणीखाली 
ठाणे (बातमीदार) ः कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातून आलेल्या नागरिकांची विमानतळावर तपासणी करण्यासह त्यांना 14 दिवस निगराणीखाली ठेवले जात आहे. फ्रान्स, चीन, इटली, दुबई तसेच इतर देशांतून ठाणे जिल्ह्यात आलेल्या 56 जणांपैकी 34 नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. यातील 22 जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणांना आजपासून मिळणार १५०० रुपये; फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात!

Jaykumar Rawal Photo Viral : व्हॉट्सॲपवर फोटो फॉरवर्ड करताना शंभर वेळा विचार करा! पणनमंत्र्यांचा मॉर्फ फोटो व्हायरल, धुळ्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

SIP Investment: 1 एप्रिलपासून गुंतवणूक सुरू करायची? SIP ठरू शकते तुमची सर्वात मोठी गेमचेंजर! कशी ते समजून घ्या सोप्या शब्दांत

'तिचे केस किती आकर्षक...' प्रियकराकडून मैत्रिणीच्या केसांची स्तुती; प्रेयसी संतापली, संतापजनक घटनेनं मुंबई हादरली

Ashok Kharat Files: ''रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या'', महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

SCROLL FOR NEXT