मुंबई

मोठा किस्सा झाला, पोलिसांना बिर्याणी पडली महाग..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - धारावी पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह एका खाजगी व्यक्तीला बिर्याणी चांगलीच महाग पडली आहे. बिर्याणीची हातगाडी लावण्यासाठी, तसेच त्यावर कारवाई न करण्यासाठी 32 हजारांची लाच पोलिसांनी मागितली होती; मात्र तडजोडीनंतर 25 हजारांची लाच घेण्यास तयार झाले होते. याप्रकरणी दोन पोलिसांसह तिघांना अटक केली आहे. पोलिस नाईक संजय तळेकर, पोलिस शिपाई मुकुंद शिंदे आणि केक विक्रेता प्रतीक मेहेर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक संदीप राणे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंदीमुळे त्याने सुरु केली बिर्याणी, पुलावची हातगाडी

याबाबत एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा मुंब्रा येथील रहिवासी असून, तो इस्टेट एंजट आहे; मात्र व्यवसायात मंदी असल्याने त्याने धारावी येथे बिर्याणी, पुलावची हातगाडी सुरू केली होती. एका व्यक्तीने त्याला धारावी पोलिस ठाण्यात भेटायला बोलावले आहे, असा निरोप दिला. त्यानुसार तक्रारदार धारावी पोलिस ठाण्यात संजय राणे यांच्यासह वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे ऑर्डर्ली मुकुंद शिंदे आणि संजय तळेकर यांना भेटले. यावेळी तिघांनी तक्रारदाराकडे गाडी लावण्याचे आणि त्यावर कारवाई न करण्यासाठी 32 हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. 

हिशोब तर वाचा 

यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे 6 हजार, चार सहायक पोलिस निरीक्षकांचे 12 हजार, चार बिट मार्शलचे 5 हजार, चारचाकी गाडीचे 4 हजार आणि या तिघांचे 6 हजार असा हिशेब असल्याचा दावा केला. मात्र, तेथून निघाल्यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय (एसीबी) गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने सापळा लावला.

गाडी कधी लावणार रे 

दरम्यान, धारावी पोलिस ठाण्यातील संदीप राणे याने तक्रारदाराला फोन करून गाडी कधी सुरू करणार असल्याची विचारणा केली. तसेच पोलिस ठाण्यासमोरील प्रतीक मेहेर या व्यक्तीकडे 25 हजार रुपये देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराकडून 25 हजार रुपये घेताना मेहेर याच्यासह संजय तळेकर, मुकुंद शिदे यांना एसीबीने अटक केली. दरम्यान, संदीप राणे यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

anti corruption bureau caught police for taking bribe by biryani hawker

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Content Creator Earning: ₹60 हजारांच्या नोकरीला बाय-बाय! फक्त 14 हजार फॉलोअर्सवर महिन्याला कमावते ₹1.12 लाख

दुरुस्तीवेळी अचानक सुरू झाला बॉयलर, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; सुरक्षा साधनांच्या अभावामुळे दुर्घटनेचा नातेवाईकांचा आरोप

डोंबिवली सोडली, जिद्दीने गोरेगावला घेतलेलं घर; आता तेजश्री प्रधानवर आली तोही फ्लॅट सोडायची वेळ, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates: राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात; खासदारांचा विरोध, पोलिसांच्या बससमोर ठिय्या

Thane News: पाण्यासाठी मुंबईकडे धाव! ठाणे पालिकेकडून पिसे बंधाऱ्यातील ५० एमएलडीची मागणी

SCROLL FOR NEXT