crime
crime sakal
मुंबई

मुंबई : तीन कोटींचं हेरॉईन बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात; आरोपीला अटक

नरेश शेंडे

मुंबई : अमली पदार्थविरोधी पथकानं (Anti narcotics cell) राजस्थानच्या एका तस्करावर मोठी कारवाई करत त्याच्याकडे तब्बल तीन कोटी रुपयांचं हेरोईन (three crore heroin) सापडलंय. प्यारे अमन उल्ला खान (६५) असं अटक (culprit arrested) करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून राजस्थानच्या (Rajasthan) प्रतापगड येथील रहिवाशी आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अमली पदार्थ विरोधी पथकानं शनिवारी धडक कारवाई करत आरोपी खानला ताब्यात घेतलं. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.(Anti narcotic cell arrested 65 year old man from Rajasthan in heroin drug delivery crime)

सविस्तर वृत्त असं की, राजस्थान येथून मुंबईला रेल आणि रस्तेमार्गानं मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकानं बोरिवली उपनगरात सापळा रचून एका वृद्ध इसमाला १ किलो हेरॉईनसह ताब्यात घेतलं.

एनडीपीएस कायद्यांतर्गत आरोपी खानवर कारवाई करण्यात आली असून न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला १९ जानेवरीपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT