मुंबई

आता असंही होतंय ! कोरोना होऊन गेलाही आणि लोकांना समजलंही नाही...

सुमित बागुल

मुंबई : मुंबईत कोरोना नियंत्रणात येईल अशी चिन्ह आहेत. अशात एका प्रायव्हेट पॅथॉलॉजि लॅबमध्ये सुरु असलेल्या अँटीबॉडी टेस्टिंगवरून असा खुलासा झालाय की, अनेक मुंबईकरांना कोरोना होऊन त्यातून ते बरे झाल्याचं समोर आलंय. ज्या नागरिकांना कोरोना होऊन गेलाय त्यांना स्वतःला कोरोना झाला होता याबद्दल माहिती नसल्याची बाब समोर येतेय. या लॅबने आपल्या रिपोर्टमध्ये नमूद केलंय की, काही लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. यावरून असं स्पष्ट होतं की त्या व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाल्या होत्या, मात्र त्यांना याबाबत माहिती नव्हती. 

भाजप नेते आशिष शेलार यांनी याबाबत मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल याना पत्र लिहून मुंबईत १ लाख अँटीबॉडी टेस्ट करण्याची विनंती केली आहे. यावरुन लॅबमधील रिपोर्ट बरोबर आहेत की नाही हे समजण्यास मदत होईल असं आशिष शेलार यांनी आपल्या पत्रात म्हटलंय. आशिष शेलार यांनी आपल्या पत्रात हेही म्हटलंय की,  प्रायव्हेट लॅबमध्ये अँटीबॉडी टेस्टिंग करण्यात आलेल्या एकूण लोकांपैकी वरळी भागातील ३२.१५ %, सांताक्रुज भागातील ३१.४५ टक्के, वांद्रे पश्चिम भागातील १७ टक्के लोकांमध्ये आधीच अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. म्हणजेच हे नागरिक कोरोना पॉझिटिव्ह होऊन बरे झाले आहेत आणि त्यांना याबाबत आता समजलंय. 

मोठी बातमी पावसाळ्यानंतर हिवाळ्यातही तापच, गारवा कोरोनासाठी अत्यंत पोषक; संशोधकांचा दावा
    
एकदा मानवी शरीरात अँटीबॉडी तयार झाल्यात की पुन्हा कोरोना होण्याची शक्यता कमी असते. यामुळे आशिष शेलार यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल याना पत्र लिहून मुंबईतील १ लाख नागरिकांच्या अँटीबॉडी टेस्टिंग कराव्यात असं सूचित केलंय. यामध्ये महापालिका कर्मचारी, बेस्ट वर्कर्सचाही समावेश करावा असंही आशिष शेलार म्हणालेत. 

antibody testing results reviles that many citizens in mumbai have covid19 antibodies

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT