sachin vaze 
मुंबई

सचिन वाझेंचा ताबा मिळताच NIAची मोठी कारवाई; UAPA अंतर्गत गुन्हा दाखल 

सकाळ डिजिटल टीम

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास ATS कडून NIA कडे आल्यानंतर एनआयएनं आरोपी निलंबित एपीआय सचिन वाझे यांचा एटीएसकडून ताबा मिळवला आहे. वाझे यांना ताब्यात घेतल्यानंतर एनआयएनं मोठी कारवाई केली असून वाझे यांच्यावर अँटिलिया स्फोटकं प्रकरणी बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) गुन्हा दाखल केला आहे. 

काय आहे UAPA कायदा?

बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायदा अर्थात UAPA हा देश आणि देशाबाहेर बेकायदा कृत्ये रोखण्यासाठी अत्यंत कठोर तरतुदी अंतर्भूत असलेला कायदा आहे. १९६७ मध्ये या कायद्यात सरकारने काही सुधारणा करत त्याला अधिक कठोर बनवलं होतं. हा कायदा संपूर्ण देशात लागू होतो. हा कायदा राष्ट्रीय तपास एजन्सीला (NIA) अधिकार देतो की ते कोणत्याही दहशतवादी कारयांमध्ये सहभागी असलेल्या संशयीत आरोपीला दहशतवादी घोषित करु शकतात. 

ठाणे सेशन्स कोर्टाचे आदेश

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन प्रकरण एनआयएकडे सोपवण्यास तयार नव्हती. मात्र, बुधवारी ठाणे येथील स्थानिक कोर्टाने एटीएसला आदेश दिले की त्यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास थांबवावा आणि तो एनआयएकडे सोपवण्यात यावा. त्यानंतर हे प्रकरण आता एनआयएकडे वर्ग करण्यात आलं आहे. दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे यांनाही एनआयएनं एटीएसकडून ताब्यात घेतलं आहे. 

शशी थरुर यांचा मोबाईल अॅपवर कारवाईचा इशारा; नक्की काय झालंय वाचा सविस्तर?

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने सचिन वाझे संबंधित एक वोल्व्हो कार दीव-दमन येथून जप्त केली आहे. ही कार सचिन वाझे यांच्या सहकाऱ्याची असून या कारच्या मालकामध्ये आणि सचिन वाझे यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे याची चौकशी केली जात आहे. सध्या या कारला फॉरेन्सक तपासासाठी पाठवण्यात आलं आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Traffic Safety : नाशिकमधील अपघातांना बसणार लगाम; महापालिकेची 'ब्लाइंड स्पॉट' निर्मूलन मोहीम!

Homemade Dhoop: बाजारच्या धूपाला म्हणा रामराम! आजच घरी बनवा केमिकल-फ्री धूप; जाणून घ्या सोपी पद्धत

Gautam Adani : शरद पवार हे माझे गुरु अन् मार्गदर्शक; गौतम अदानी यांचे गौरवोद्गार

Ravindra Chavan: जागावाटपावरून महायुतीत तणाव! भाजप आंदोलनानंतर रवींद्र चव्हाण यांचे सूचक संकेत

Latest Marathi News Live Update : एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT