Akshata-Naik-Aadya-Naik 
मुंबई

आशियातील सर्वात श्रीमंत झाल्यावरच न्याय मिळेल; अन्वय नाईकांच्या कन्येची उद्विग्न प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई:- अन्वय नाईक प्रकरणातील घडामोडी आणि राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजलेलं मनसुख हिरेन प्रकरण या पार्श्वभूमीवर नाईक कुटुंबीयांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपा नेत्यांवर टीकास्त्र सोडलं. "उद्योगपती अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं आढळली आणि त्यानंतर मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेंची बदली होणार असल्याची माहिती देण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात अधिवेशनात आक्रमक भूमिका मांडली. अशाच प्रकारची भूमिका त्यांनी माझ्या वडिलांबाबत का मांडली नाही? सर्वांना समान न्याय असं म्हटलं जातं. पण माझ्या वडिलांच्या आत्महत्येच्या प्रकरणाला तीन वर्षे झाली, तरीही त्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी ठोस मुद्दा मांडला नाही. झटपट न्याय मिळवण्यासाठी आशियातील सर्वात श्रीमंत माणूस असणंच गरजेचं आहे का?" असा भावनिक सवाल अन्वय नाईक यांच्या कन्या आज्ञा नाईक यांनी केला.

"सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा अंतिम निकाल नाही. कोर्टाने नोंदवलेलं निरिक्षण म्हणजे निकाल नाही. अद्यापही अन्वय नाईक प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात मुंबई पोलिसांना दोष देणं आणि त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात आल्याचं वक्तव्य करणं हे खूपच चुकीचं आहे. देशातच नव्हे तर जगात नावलौकिक असलेल्या मुंबई पोलिसांबाबत फडणवीस आणि भाजपा नेत्यांनी अशी भाषा वापरणे चुकीचं आहे", असं अन्वय नाईक यांच्या पत्नी म्हणाल्या.

आम्ही जेव्हा तक्रार दाखल केली तेव्हा आम्हाला अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. मुकेश अंबानींना आलेली धमकी ही गंभीर आहेच याबाबत वाद नाही. पण आम्हालाही जीवे मारण्याची धमकी आली होती. त्याची विरोधी पक्षनेत्यांनी दखल का घेतली नाही? त्याबाबत अधिवेशनात आक्रमक भूमिका का मांडण्यात आली नाही. संशयित आरोपींना अटक झाल्यानंतरही आम्हाला धमक्या आल्या. तुमचा व्यवसाय कसा सुरळित चालतो ते बघू.. तुमच्या मुलीचं लग्न कसं होतं ते पाहतो? अशा पद्धतीचे फोन आम्हाला अजूनही येत आहेत", अशी व्यथा नाईक यांच्या पत्नीने मांडली.

"माझ्या वडिलांच्या आत्महत्येची केस का दाबण्यात आली? त्याची चौकशी व्हायला हवी. केस बंद करण्यासाठी आमच्यावर दबाव टाकण्यात आला. आमची जबरदस्ती सही घेण्यात आली. या प्रकरणाची SIT चौकशी व्हावला हवी. कारण या प्रकरणात आरोपींच्यापेक्षा अधिक आमचीच जास्त चौकशी करण्यात आली", असंही नाईक कुटुंबीय म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT