मुंबई

"आता काहीही झालं तरी काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू होणार नाही", काश्मीर मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा

सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्राचे विरोधीपक्ष आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून काँग्रेसला धारेवर धरलं. आता काहीही झालं तरी काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा लागू होणार नाही. पुन्हा जर कोणीही हे कलम लावण्याचा प्रयत्न केला तर जनता माफ करणार नाही, असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणालेत. 

जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्यात आले, आता जम्मू काश्मीरमधील जनजीवन पूर्णपणे पूर्वपदावर आले आहे. तिथे कोणताही भारतीय गुंतवणूक करू शकतो, पायाभूत सुविधा कामे सुरू झाली आहेत. असे असताना भारत विरोधी शक्ती तिथल्या विविध राजकीय पक्षांशी हातमिळवणी करून 370 कलम पुन्हा लागू करण्याबाबत हालचाली करत आहे. गुपकर आघाडीअंतर्गत काश्मीरमधील अनेक पक्ष एकत्र आले आहेत, यामध्ये काँग्रेस सहभागी झाले आहे असं फडणवीस म्हणालेत. 

एकीकडे फारुख अब्दुल्ला हे चीनच्या मदतीने 370 कलम लागू करावे अशी भाषा करत आहेत, तर दुसरीकडे मेहबुबा मुफ्ती म्हणतात काश्मीरचा झेंडा लागला नाही तर राष्ट्रीय ध्वजाची मोडतोड करू अशी वक्तव्य करत आहेत. अशात काँग्रेसला गुपकर आघाडीचा अजेंडा मान्य आहे का ? असा सवाल यावेळी फडणवीसांनी काँग्रेसला विचारला. त्यामुळे देशविरोधी शक्तींसोबत काँग्रेस उभा असेल तर आम्ही रोज काँग्रेसला प्रश्न विचारू, काँग्रेसला उघडं पाडण्याचे काम करू असं देखील फडणवीस म्हणालेत.  

पत्रकार परिषदेत या विषयावर बोलताना फडणवीस म्हणालेत की, आता काहीही झालं तरी 370 कलम पुन्हा लागू होणार नाही हे आम्ही काँग्रेससहित गुपकर आघाडीला आम्ही सांगू इच्छितो. 

( संपादन - सुमित बागुल )

at any cost now article 370 will not be implemented in kashmir fadanavis targets congress

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संपत्ती कशी वाढली? शिंदेंचे मंत्री शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस, अडचणीत वाढ

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पिकांनी नेसला हिरवा शालू, मशागतीच्या कामांना वेग

अरे हा तर डिट्टो कॉपी! गुजराती चित्रपटाने कॉपी केली मुक्ता बर्वेच्या गाजलेल्या सिनेमाची कथा? ट्रेलर पाहून नेटकरी म्हणतात-

Success Story: केडगावचा अनुज पितळे पहिल्याच प्रयत्नात सीए झाला!

Success Story : २२ व्या वर्षी 'सीए'; प्रणवकडून इच्छाशक्तीला प्रामाणिकपणे कष्टाची जोड

SCROLL FOR NEXT