kalyan
kalyan 
मुंबई

'वृत्तपत्र विकणारा विद्यार्थी भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो'

रविंद्र खरात

कल्याण : पंधरा ऑक्टोबर भारताचे माजी राष्ट्रपती थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयाने शाळेच्या आवारातच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावे वृत्तपत्र वाचन कट्टा निर्माण केला आहे. या कट्ट्याचे लोकार्पण भन्ते आनंद महाथेरो यांनी फीत कापून केले.

कल्याण पूर्व मधील सम्राट अशोक विद्यालयामध्ये सोमवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये भारतरत्न म्हणून सन्मानित सचिन तेंडुलकर यांच्या नावे सचिन तेंडूलकर जिमखाना साहित्य विभागाचे उद्घाटन नुकत्याच काठमांडू येथे झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा तुषार थिटे यांच्या हस्ते करण्यात आले. या समयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भन्ते आनंद महाथेरो यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून देतांना सांगितले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील अनेक ग्रंथ, पुस्तके वाचली त्यातूनच त्यांना ज्ञान संपादन करता आले. डॉ अब्दुल कलाम यांचे बालपण खडतर होते. इयत्ता सहावीच्या वर्गात असताना वृत्तपत्र विकायचे त्यांना त्याच्यातून वाचनाची आवड निर्माण झाली. बुद्धिमत्तेचे असल्याने शास्त्रज्ञ झाले देशाचे राष्ट्रपती झाले.

भारतासाठी त्यांचे योगदान फार मोठे आहे, क्रीडा क्षेत्रात नवनवीन खेळ येत आहेत तेही विद्यार्थ्यानी आत्मसात करावे. इतर विषयांबरोबर खेळालाही महत्व द्यावे असे सुवर्णपदक विजेते तुषार थेटे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना वाचन विषयी महत्व सांगून आपण निर्माण करत असलेल्या वाचन कट्याचा लाभ विद्यार्थ्यासह परिसरातील नागरिकांनाही होईल वाचन कट्ट्यासाठी वृत्तपत्र शाळेतील शिक्षक देणार आहेत त्यांचेही आभार मानले कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय मुख्याध्यापक गुलाबराव पाटील , सुजाता नलावडे उपस्थित होते . सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी तर आभार संतोष कदम यांनी मानले .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT