Appoint consultant for expansion of KEM Hospital Sachin Padwal mumbai health sakal
मुंबई

Mumbai News : केईएम रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी सल्लागाराची नियुक्ती करा - सचिन पडवळ

माजी नगरसेवक सचिन पडवळ यांचे अतिरिक्त आयुक्तांना पत्र

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - केईएम रुग्णालयाच्या परिसरात १०३ इमारती आहेत. परंतु नियोजना अभावी योग्य रित्या रुग्ण सेवा करणे शक्य होत नाही. त्यामुळे केईएम रुग्णालयाचा विस्तार करणे गरजेचे असून यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांना दिले आहे.

परळ येथील केईएम रुग्णालयात देशातून लाखो रुग्ण हे उपचार घेण्यासाठी येत असतात. रुग्णालय परिसरात लहान-मोठ्या जवळपास १०३ इमारती आहेत. या इमारतींची डागडुजी करूनच पूर्ववत केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांना उत्कृष्ट सेवा देणे शक्य होत नाही.

दर्जेदार रुग्ण सेवा देण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण जागा विस्तार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करावी. योग्यरित्या आखणी करुन घेतल्यास भविष्यात नियोजनबद्ध इमारती बांधून रुग्णांना अधिकाधिक सोईस्कर सेवा देणे प्रशासनास शक्य होईल, असे पडवळ यांनी पत्रात नमूद केले आहे.

अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांनी यापूर्वी राज्य सरकारच्या वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेले आहे. त्यामुळे त्यांना या क्षेत्राची संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे त्यांनी या विषयी जातीने लक्ष देत दर्जेदार रुग्ण सेवेसाठी प्रयत्न करावे, असेही पडवळ यांनी पत्रात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT