मुंबई : खासगी रुग्णालयांना आता कोरोना आणि बिगरकोरोना रुग्णांकडून मनमानी वसुली करता येणार नाही. राज्य सरकारने या रुग्णालयांना दरपत्रक ठरवून दिले असून, या पत्रकानुसार रुग्णालयांना पैसे आकारावे लागणार आहेत. खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे आल्या होत्या. विमा पॉलिसी नसलेल्या रुग्णाकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
आरोग्य विभागाचे हे दरपत्रक कोरोना आणि बिगरकोरोना रुग्णांच्या उपचारासाठी लागू होणार आहे. रुग्णालय व्यवस्थापन हे उपलब्ध कर्मचारी, डॉक्टरांच्या संख्येनुसार रुग्णांकडून जादा शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. मुंबई, पुण्यातील ज्या रुग्णालयांचे जीप्सासोबत (विमा कंपन्याची संघटना) करार नाहीत, त्या रुग्णालयांसाठी दरपत्रक निश्चित केले आहे. उपचारादरम्यान पीपीई कीटस्, एन 95 मास्कचा भुर्दंडही रुग्णांवर लादता येणार नाही. उर्वरित राज्यातील रुग्णालयांनी जे विविध त्रयस्थ करार केले आहेत, त्यानुसार एकाच उपचारासाठी दर निश्चित केले आहेत. त्यांना जनरल वॉर्डच्या किमान दरापेक्षा जास्त दर आकारता येणार नाही. जीप्सा पॅकेज दराशी संलग्न नसलेली रुग्णालये या दरापेक्षा जास्त आकारू शकणार नाहीत. या अधिसूचनेमुळे आधीच तोटा सहन करत असलेल्या खासगी आरोग्य क्षेत्रापुढे आर्थिक समस्या निर्माण होतील, असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
असे असतील दर
हे नियम बंधनकारक
कोव्हिड उपचारांसाठी कुणीही अवास्तव शुल्क आकारू नये. सरकारने केलेल्या अधिसूचनांचा अभ्यास करूनच पुढची पावले उचलावी लागणार आहेत; मात्र या परिस्थितीत पूर्णपणे रुग्णालय चालवणेही कठीण होत आहे. असे असले तरी जास्तीचे शुल्क आकारणे चुकीचे आहे.
- अविनाश सुपे, संचालक, हिंदुजा हॉस्पिटल.
सध्याच्या काळात शासकीय यंत्रणेला अनेक खासगी डॉक्टर सहाय्य करीत आहेत; मात्र काही लोक जनतेच्या असहायतेचा फायदा घेऊन कठीण काळातसुद्धा स्वतःचा फायदा करून घेत आहेत, असे ऐकण्यास मिळत आहे. तपासणीअंती असे प्रकार आढळून आल्यास अशा कोणत्याही घटकास सोडले जाणार नाही. निश्चितपणे सरकार दखल घेईल व कारवाई होईल.
- राजेंद्र यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.