मुंबई

द्रुतगरी महामार्गावर पोलिसांनी घातली त्यांच्यावर झडप, किती किलो गांजा पकडला? वाचा

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : शहरात विविध ठिकाणी गांजासारख्या अनेक अमली पदार्थांची विक्री होत असल्याची तक्रार शिवसेनेकडून करण्यात आली होती. यावर ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत द्रुतगती मार्गावर गांजा विक्रीसाठी आलेल्यांवर झडप घातली आहे. या कारवाईत सव्वातीन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. 

हिल लाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत मामाच्या ढाब्याजवळ ही कारवाई करण्यात आली असून यात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ताहेर इमायद सैय्यद असे आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तरडे, सहायक पोलिस निरीक्षक युवराज सालगुडे आदींनी ही कामगिरी बजावली आहे. 

शिवसेनेकडून कारवाईची मागणी 

शिवसेना नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर, युवासैनिक विकी भुल्लर यांनी उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुशील जावळे यांना रीतसर निवेदन देऊन झोपडपट्टी परिसरात गांजासह अनेक अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे कळवले होते. शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे यांनीदेखील पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांची भेट घेतली होती. 

around forty kilograms of weed marijuana seized in Ulhasnagar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT