'ही' परदेशी फळे बाजारात दाखल; ग्राहकांना पडलीये त्यांची भुरळ.. 
मुंबई

'ही' परदेशी फळं आलीत बाजारात; तुम्ही पाहिली का?

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळबाजारात परदेशी फळांची आवक सुरू झाली आहे. परदेशी ड्रॅगन फ्रूट, किवी, सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. परदेशी फळांना भारतीय बाजारपेठेत मागणी आहे. ड्रॅगन फ्रूट मूळचे थायलंड आणि चीनमधील आहे. मात्र भारतीय बाजारपेठेतून या फळाला असलेली वाढती मागणी विचारात घेऊन स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्याकडे या फळाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. 

साधारणत: दिवाळीच्या सुमारास स्थानिक ड्रॅगन फ्रूट एपीएमसी बाजारात दाखल होते. आता त्यांचा हंगाम संपत आला असून, चायना व व्हिएतनाममधून आयात सुरू झाली आहे. चार-पाच वर्षांपूर्वी भारतात एपीएमसीमध्ये ड्रॅगन फ्रूटच्या आयातीला सुरुवात झाली. डेंगी-मलेरिया यांसारख्या आजारांवर हे फळ परिणामकारक असल्याच्या चर्चेमुळे त्याची मागणी वेगाने वाढली आहे. सध्या बाजारात पाच हजार पेट्या ड्रॅगन फ्रूट दाखल होत आहे. 10 किलोची पेटीची किंमत 900 रुपयांना मिळत आहे; तर यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. न्यूझीलंड व ग्रीसहून आयात केल्या जाणाऱ्या किवीलाही भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. एपीएमसीमध्ये हे फळ दाखल झाले आहे. बाजारात सध्या दहा हजार पेट्या आयात होत आहेत. 8 ते 10 रुपयांना एक नग मिळत आहे. 

सिमला, जम्मू-काश्‍मीरमधील सफरचंदांची आवक आता कमी झाली असून, इराणहून आयात केलेल्या सफरचंदांची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात सात ते दहा हजार पेट्या दाखल होत आहेत. यात 10 किलो वजनी पेटीची किमंत 800 ते 900 रुपये आहे. तर सिमल्यातील सफरचंदांच्या 14-16 किलोच्या पेटीला 500 ते 800 रुपये भाव मिळत आहे. 
- विजय भेंडे, व्यापारी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: भीषण घटना! क्रिकेटच्या मैदानावर वीज कोसळली; एका खेळाडूचा मृत्यू, अनेक जखमी, मान्सूनचा कहर

Pune Bus Accident : इलेक्ट्रिक 'शिवाई' बसची अनेक गाड्यांना धडक, घटनास्थळावरचा VIDEO आला समोर

देऊळ बंद २ ने राजा शिवाजी सिनेमाचाही रेकॉर्ड मोडला, आतापर्यंत कमावले तब्बल इतके कोटी

Thane News: अंबरनाथ शिवमंदिर परिसरातील आरक्षणाविरोधात विहिंप-बजरंग दल आक्रमक, बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : भारत-इस्रायल संरक्षण सहकार्याला नवी गती; राजनाथ सिंह-आमीर बाराम यांची भेट

SCROLL FOR NEXT