मुंबई

आधी स्वतःचं चित्र रेखाटलं, त्यावर हार घातला आणि लिहिली स्वतःच्याच मृत्यूची तारीख आणि 'त्या' तारखेला...

सुमित बागुल

पालघर - कोरोना विषाणू या जगात आला आणि त्याने अनेकांचे जीव तर घेतलेच पण सोबतच लागून आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक नकारात्मक गोष्टी देखील आल्यात. कोरोना संसर्ग वाढला आणि देशभरात लॉकडाऊन लागला. सगळं पूर्णपणे ठप्प झालं. याचा गंभीर परिणाम लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर तर झालाच सोबतच अनेकांच्या मानसिक स्थितीवर देखील झालाय. विविध सर्व्हेक्षणातून लॉकडाऊन कसा आपल्या मानसिक स्थितीवर हल्ला करतोय हेही समोर आलं. हीच बाब आता पुन्हा एकदा, अधिक ठळकपणे अधोरेखित झालीये. पालघरमधील गंगाराम चौधरी नामक विना अनुदानित शाळेतील कला शिक्षकाने नैराश्यातून आत्महत्या केलीये. 

नैराश्याची परिसीमा गाठली आणि... 

पालघर जल्ह्यातील डहाणू तालुक्यातील ही हृदयद्रावक घटना आहे. धक्कादायक बाब म्हणजे निंबापूर महालपाडा भागातील ज्या कला शिक्षकाने आत्महत्या केलीये त्याने आधी स्वतःचं चित्र रेखाटलं होतं. स्वतःच्या चित्रावर त्यांनी हार देखील घातला. त्यावर आपल्या मृत्यूची तारीखही लिहिली आणि नंतर ठरलेल्या तारखेला गळफास घेतला. 

कारण, न मिळालेला पगार आणि शिक्षकाची नोकरी ?

गळफास घेतलेल्या कला शिक्षकाचं पाच वर्षांपूर्वी लग्न झालेलं. विनाअनुदानित शाळेत ते शिकवत असत. गेल्या अनेक वर्षांपासून वेतन मिळत नव्हतं म्हणून बायको घर सोडून गेली. आधीच कोरोनामुळे आलेलं नैराश्य त्यात बायकोही सोडून गेल्याने गंगाराम चौधरी अधिकच नैराश्यात गेल्याची माहिती समजतेय. कला शिक्षक आणि त्यातही  चित्रकलेत पारंगत असल्याने त्यांनी ८ जून रोजीच स्वतःचं चित्र रेखाटलं. त्यावर १५.७.२०२० ही स्वतःच्या मृत्यूची तारीखही लिहिली.

१५ तारखेला घरातील इतर सदस्य भात लावणीसाठी बाहेर गेल्याचा फायदा उचलत गंगाराम चौधरी यांनी गळफास घेत आत्महत्या केली. 

art teacher of palghar draws his own portrait and writes date of his last day and took extreme step 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Constituency : नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या दारी महाजन; बंद दाराआड सव्वा तास चर्चा

Latest Marathi News Live Update : उत्तर प्रदेशचा 'बुलडोझर पॅटर्न' सांगलीत.. योगी आदित्यनाथ यांच्या स्वागताला आणले जेसीबी

World Cupसाठी निवड झालेल्या 15 खेळाडूंची कशी आहे IPL मधील कामगिरी? उपकर्णधार पांड्या ठरतोय फ्लॉप

Shah Rukh Khan: "तो तर बॉलिवूडचा जावई, मी त्याला तेव्हापासून ओळखतोय, जेव्हा तो.."; किंग खानकडून किंग कोहलीवर कौतुकाचा वर्षाव

Gold ETF: ‘ईटीएफ’ देतेय ‘सोन्या’सारखी संधी; गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायामुळे चलती

SCROLL FOR NEXT