Tata AIG General Insurance Company
Tata AIG General Insurance Company esakal
मुंबई

महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी लीड इन्शुरर म्हणून 'टाटा एआयजी कंपनी'ची नियुक्ती

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र राज्यासाठी नॉन-लाईफ इन्शुरर म्हणून टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी (Tata AIG General Insurance Company) लिमिटेडची निवड केली आहे.

मुंबई : इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाने (आयआरडीएआय) महाराष्ट्र राज्यासाठी नॉन-लाईफ इन्शुरर म्हणून टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी (Tata AIG General Insurance Company) लिमिटेडची निवड केलीये.

"२०४७ सालापर्यंत सर्वांसाठी विमा" उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी इतर नॉन-लाईफ व आरोग्य विमा कंपन्यांच्या सहयोगाने राज्यात सर्वत्र विमा सेवांचा प्रसार व्हावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय.

निवड करण्यात आलेले इन्शुरर म्हणून, टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या सर्व नॉन-लाईफ आणि आरोग्य विमा कंपन्या, आयआरडीएआय आणि राज्य सरकार यांच्या सहयोगाने सध्याच्या सरकारी योजनांबाबत जागरूकता निर्माण करेल, राज्यात ग्राम पंचायत, जिल्हा व राज्य स्तरावर विमा सेवांची पोहोच वाढवेल.

महाराष्ट्र राज्यात दीर्घकाळपर्यंत टिकून राहील अशा आर्थिक विकासाला पाठिंबा देण्यासाठी, संरक्षणात असलेल्या कमतरता कमी करण्यासाठी विमा सेवा खूप मोठ्या प्रमाणावर स्वीकारले जाणे नक्कीच गरजेचे आहे. राज्यामध्ये विमा सेवांचा प्रसार सर्वत्र व्हावा यासाठी आयआरडीएआयने काही महत्त्वाचे विभाग निश्चित केले आहेत.

यामध्ये मोटार विमा, आरोग्य विमा, पीक विमा यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसारख्या प्रमुख सरकारी योजनांचा जास्तीत जास्त स्वीकार केला जावा यासाठी देखील टाटा एआयजी मदत करेल.

टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे एमडी व सीईओ नीलेश गर्ग यांनी सांगितलं की, "लीड इन्शुरर म्हणून नेमणूक झाल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. इतर नॉन-लाईफ व आरोग्य विमा कंपन्यांमधील आमच्या सहकाऱ्यांसोबत, विमा नियामक आणि महाराष्ट्र राज्य सरकारसोबत मिळून व्यक्ती व व्यवसाय यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी विम्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी व विमा सेवांचा प्रसार व्हावा यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

इन्शुअर्ड आणि विमा पॉलिसीमधून मिळणाऱ्या कव्हरेजबाबत जागरूक असणारा समाज निर्माण करण्यासाठी समन्वयपूर्वक काम करण्याच्या दिशेनं उचलण्यात आलेलं हे एक पाऊल आहे. यामुळं महाराष्ट्रातील जनता विमा साक्षर होईल. महाराष्ट्रातील लोकांच्या वाढत्या, नवनवीन गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण विमा उत्पादने व सेवा विकसित करण्यासाठी आम्ही आमची नैपुण्ये, तंत्रज्ञान आणि भागीदारी यांचा उपयोग करून घेऊ."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT