मुंबई

दादर, माहीममध्ये 'या' ठिकाणी होणार कृत्रिम तलावांची निर्मिती; मनसेच्या पाठपुराव्याला यश

रजनिकांत साळवी


प्रभादेवी : कोरोनापार्श्वभूमीवर दादर- माहीम परिसरात कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. त्यास पालिकेने संमती दर्शविली आहे.

गणेशोत्सव काळात घरगुती गणेश मुर्तींंचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आव्हान मुंबई महापालिकेने केले आहे. मात्र, दादर-माहिममध्ये प्रत्यक्षात कृत्रिम तलावांची संख्या कमी असल्याबाबतचे निवेदन मनसेचे उपाध्यक्ष व दादर-माहीम विधानसभा विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी गुरुवारी पालिकेचे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना दिले. तसेच, दादर-माहीम परिसरात कृत्रिम तलावांसाठी मनसेने जागाही सुचविल्या. त्यानुसार पालिकेच्या जी उत्तर विभागाने परिसरात 7 ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्याचे आश्वासन दिल्याचे किल्लेदार यांनी सांगितले. 

शिवाजीपार्क येथील महापालिका क्रीडा भवन, मृदुंगाचार्य मैदान, रमा गावंडे मैदान, जाखादेवी मंदिर भूखंड-दादर, एनटोणीया शाळेचे पटांगण, एस. के. बोले रोड येथील चौधरी वाडी मैदान, प्रभादेवी येथील चवन्नी गल्ली मैदान येथे व धारावीत तीन कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Bandh : शेतकरी, कामगारांची आज देशव्यापी संपाची हाक, काय सुरू, काय बंद ? घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा महत्त्वाची माहिती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 फेब्रुवारी 2026

Satara News:महिला हवालदारावर लाचलुचपतची कारवाई; सातारा पाेलीस दलात खळबळ, जप्त मोटार सोडण्यासाठी नेमकं काय केलं?

आजचे राशिभविष्य - 12 फेब्रुवारी 2026

Shambhuraj Desai: सातारा झेडपीतील सत्तेबाबत उपमुख्यमंत्री शिंदेच घेणार निर्णय: मंत्री शंभूराज देसाई, भाजप नेते गप्प नाहीत, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT