मुंबई

नाट्य निर्माते दत्ता घोसाळकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ठाण्यात निधन

सकाळ वृत्तसेवा


ठाणे -  नाट्यक्षेत्रात एक नावाजलेले रत्न दत्तात्रय घोसाळकर यांचे मंगळवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने ठाणे येथे निधन झाले. महागिरी कोळिवाडा येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जवाहर बाग स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी अंतिम संस्कार केले जाणार आहेत. यदा कदाचित नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर यांना रात्री एकच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. दत्तविजय प्रॉडक्शनच्या माध्यमातून 17 नाटके त्यांनी निर्माण केली. त्यात आईचं घर उन्हाचं, यदा कदाचित, देहभान, तनमन तुझ्याविना, रामनगरी, हम पांच सारखे वेगळे विषय त्यांनी हाताळले. ते एक उत्कृष्ट मराठी नाट्य निर्माते होते. 
दत्तात्रय घोसाळकरांनी त्यांच्या संस्थेतर्फे ठाण्यातील अनेक लेखक, दिग्दर्शक, कलाकारांना रंगमंचावर प्रथम आणण्याचा प्रयत्न केला 

कलाकाराचा एक वकूब असतो. मराठी रंगभूमीवर काही निर्मिती संस्थादेखील आपापला वकूब राखून नाटकं करतात. दत्तविजय प्रॉडक्शन्स ही संस्था गेल्या शतकाच्या नव्वदीच्या दशकाअंती 'यदाकदाचित' या तुफान यशस्वी नाटय़निर्मितीने रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. 'यदाकदाचित' हे नाटक खरं तर संतोष पवार यांच्या एकांकिकेतून जन्माला आलेलं. त्या काळी संतोष पवार हा महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांचा बादशहा होता. दत्तविजय संस्थेने संतोष यांची एकांकिका व्यावसायिक नाटक म्हणून रंगभूमीवर आणली आणि दत्ता घोसाळकर व त्यांचे बंधू अरविंद घोसाळकर यांनी मराठीत नवनिर्मात्यांच्या एन्ट्रीचा पायंडा रचला. आज जवळ जवळ वीस वर्षांचा इतिहास या संस्थेचा आहे आणि या इतिहासात एकाहून एक हिट नाटकं आहेत. त्यांचे यदा कदाचित रिटर्न हे नाटक 26 डिसेंबर पासून रंगभूमीवर येणार होते. कोरोनानंतर त्यांचा हा पहिला प्रयोग होणार होता. यदा कदाचित रिटर्न्स हे नाटकात बाहुबली सिनेमाचा बॅकड्रॉप घेऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न मांडला गेला आहे. हे नाटक नव्याने रंगभूमीवर येण्या आधीच घोसाळकर यांचे निधन झाल्याने कला क्षेत्रातून एकच हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

SCROLL FOR NEXT