Arun-Jaitley
Arun-Jaitley sakal media
मुंबई

"वस्तू व सेवा कराने भारत जोडणे हे जेटलींचे योगदान"

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : संपूर्ण भारताला वस्तू व सेवा कर (GST) या धाग्याने एकत्र बांधणारे अरुण जेटली (Arun jaitley) यांचे योगदान चिरस्मरणीय होते असे गौरवोद्गार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी व्यक्त केले. पेडर रोडवरील जसलोक रुग्णालयासमोर जेटली यांच्या स्मारकाचे (Statue) उद्धाटन करताना त्या बोलत होत्या. श्रीमती संगीता अरूण जेटली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यावेळी हजर होते.

स्व. श्री अरुण जेटली जी एक महान राजकारणी, कायदे तज्ञ आणि भारताचे अर्थमंत्री होते. ते आमच्यासाठी गुरु समान होते. आम्हा सर्वांसाठी त्याच्यासोबत काम करणे हे सोभाग्य होतं. त्यांच्या नावाने आज या स्मारकाचे उद्‌घाटन करणे हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. अरुण जेटली यांच्या स्मारकाच्या उद्‌घाटनानंतर केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मुंबईतील फिल्म्स डिव्हिजन सभागृहात संबोधन केले.

महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते, श्री देवेंद्र फडणवीस, श्री अरुण जेटली जी यांचे स्मरण करताना म्हणाले की ते महान राजकारणी, कायदे तज्ञ आणि भारताचे अर्थमंत्री होते. त्यांनी नेहमी विरोधी पक्षाचा भ्रष्टाचार उघड केला, त्याचबरोबर वैयक्तिक संबंधही जपले. परंतु त्यांनी कामात राष्ट्राशी कधीही तडजोड केली नाही. ते खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुष होते. मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार श्री मंगलप्रभात लोढा यांनी स्वागतपर भाषण केले आणि स्व. अरुण जेटली यांचे स्मरण करताना की त्याच्या प्रतिभा क्षमतेचे सामर्थ्य संपूर्ण देशाने मानले होते. त्यांच्या स्मरणार्थ बांधलेले हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील. मंगलप्रभात लोढा यांनी या कामात सहकार्या दिल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले.

फिल्म्स डिव्हिजन सभागृह, मुंबई येथे केलेल्या संबोधना च्या आधी केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारमन यांनी आज मुंबई के पेडर रोडवरील जसलोक हॉस्पिटलच्या समोर, डॉक्टर निवास च्या जवळ स्व. अरूण जेटली यांच्या स्मारकाचे उद्‌घाटन केले. यावेळी महाराष्ट्र विधान सभा विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपा अध्यक्ष व विधायक श्री मंगलप्रभात लोढ़ा, वरिष्ठ खासदार श्री गोपाल शेट्टी, श्री प्रफुल पटेल, श्रीमती संगीता अरूण जेटली, महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर सहित दुतावासातील नागरिक तसेच गणमान्य लोक उपस्थित होते. हा कार्यक्रम लोढ़ा फाउंड़ेशन तसेच स्व. अरुण जेटली फाउंड़ेशनच्या सहयोगाने आयोजित केला होता.

शरद पवार असोत, प्रफुल्ल पटेल किंवा स्व.अहमद पटेल माझे पती अरुण जेटली यांचे सर्वांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.उठबस ,भेटीगाठीत ते सर्वपक्षीय संबंध ठेवत पण राजकारणात मात्र हे संबंध ते कटाक्षाने दूर ठेवत.आज मुंबईत त्यांचे स्मारक उभारले जात असताना याच संबंधांचे स्मरण ठेवत शरद पवारांनी सर्वतोपरीने मदत केली याचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.जेटलीजींचे स्मरण होत नाही असा एकही दिवस जात नाही असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांनी राजकारणात आल्यानंतर आणि त्यापूर्वीही आपल्याला कायम मार्गदर्शन केले असे आवर्जून सांगितले. महाराष्ट्रासह अनेक राज्यातील घडामोडींची त्यांना अचूक माहिती असे.जेटलीजींनी कोणत्याही प्रकारे सरकारी पैशाचा वापर केला नाही ,त्यांचे व्यक्तीगत खर्च ते स्वकमाईतून करीत याकडे फडणवीसांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT