मुंबई

२५ कोटी डीलचा आरोप करणाऱ्या प्रभाकर साईलला पोलीस संरक्षण

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली.

रश्मी पुराणिक

मुंबई: आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील (aryan khan drugs case) पंच प्रभाकर साईलने (prabhakar sail) गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आहे. एका व्हिडिओमधुन प्रभाकर साईलने २५ कोटींची डील करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा खळबळजनक आरोप केला आहे. आता प्रभाकर साईलला राज्य सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी याबाबत पोलिसांकडून माहिती घेतली.

प्रभाकर साईलने नेमके काय आरोप केलेत?

क्रूझवर झालेल्या छापेमारीवेळी प्रभाकर साईल किरण गोसावीसोबत होता. सॅम नावाच्या व्यक्तीला आणि गोसावीला एनसीबी कार्यालयाजवळ भेटताना त्याने पाहिले. ''आर्यनला ताब्यात घेतल्यानंतर शाहरुखची मॅनेजर पूजाला हे दोघे भेटले. त्यांच्यामध्ये निळ्या मर्सिडीज कारमध्ये बोलणे झाले. हे प्रकरण दाबण्यासाठी हे बोलणं सुरू होते. २५ कोटींमध्ये ही डील झाली होती"

"त्यानुसार ८ कोटी समीर वानखेडे सरांना द्यायचे आहेत आणि उरलेले आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, असे किरण गोसावी फोनवरून कोणासोबत तरी बोलला होता. तसेच एनसीबीने मला खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली'' असे गंभीर आरोप या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहेत.

समीर वानखेडे काय म्हणाले?

"आपल्या बाबत खोटे दस्तावेज प्रसिद्ध केले जात आहेत. आपण या प्रकाराला चॅलेंज करणार आहोत. माझ्या मूळ गावी जा आणि तपासा. आपला जो जन्म दाखला सोशल मीडियावर प्रसिद्ध केला जात आहे, तो खोटा आहे" असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. "आपल्या विरोधात खोडसाळ प्रकार सुरू आहे. याला आपण कायदेशीर उत्तर देऊ. याबाबत आपण लवकरच जाहीर खुलासा करणार आहोत" असे समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT