Aryan Khan
Aryan Khan Sakal
मुंबई

आर्यनचं अभिनेत्रीसोबत ड्रग्जसंदर्भात चॅटिंग; NCBने कोर्टात दिले पुरावे

स्वाती वेमूल

क्रुझवरील अमलीपदार्थ प्रकरणात अटकेत असलेल्या सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा, आर्यनच्या Aryan Khan जामीन अर्जावर आज (बुधवार) दुपारी सुनावणी होणार आहे. आर्यनने केलेल्या जामीन अर्जावरील निकाल विशेष न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्याआधी केंद्रीय अमलीपदार्थ विरोधी पथकाने (NCB) आर्यन आणि एका बॉलिवूड अभिनेत्रीदरम्यान ड्रग्ज संदर्भात झालेल्या चॅटिंगचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले आहेत. २ ऑक्टोबर रोजी हे दोघं ड्रग्जसंदर्भात चॅट करत होते, असं वृत्त 'इंडिया टुडे'नं दिलं आहे. याच दिवशी आर्यनसह इतर सात जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं होतं. शिवाय, काही ड्रग्ज तस्कऱ्यांसोबतही आर्यनने चॅटिंग केल्याचे पुरावेही न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत. आर्यनसह आरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांनीसुद्धा विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. एनसीबीने या अर्जाला तीव्र विरोध केला होता.

मागणी सुनावणीतील एनसीबीचा युक्तीवाद-

'आर्यन मागील अनेक वर्षांपासून अमलीपदार्थ घेत आहे. त्याला या क्रुझवरील ड्रग्ज पुरवठ्याची माहिती होती आणि यामध्ये आंतरराष्ट्रीय तस्करांचा समावेश आहे. त्यामुळे तपास यंत्रणेला आंतरराष्ट्रीय पातळीवरील धागेदोरे तपासायचे आहेत, म्हणून कोणत्याही आरोपीला जामीन मंजूर करु नये,' असा युक्तिवाद अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला होता. अमलीपदार्थ परिणाम देशाला भोगावे लागत आहे, तरुण पिढी देशाचे भवितव्य आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई हवी, आपली भूमी गांधी आणि बुध्दांची आहे, याचे भान असायला हवे, असा अंतिम युक्तिवाद सिंह यांनी केला होता.

मागील सुनावणीतील आर्यनच्या वकिलांचा युक्तीवाद-

आर्यनच्या वतीने या युक्तिवादाला विरोध करण्यात आला. 'अमलीपदार्थ विरोधात देशाचे धोरण व्यापक असून यामध्ये सुधारणांचा समावेश आहे. आर्यनची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, त्याच्याकडे काही आढळले नाही आणि त्याने अमलीपदार्थ सेवनही केले नव्हते. त्यांनी त्याला जामीन मंजूर करावा,' अशी मागणी अ‍ॅड. अमित देसाई यांनी केली. विविध न्यायालयांच्या निकालपत्रांचा दाखलाही यावेळी देण्यात आला होता. आर्यनवर कठोर निर्बंध घाला पण त्याच्या स्वातंत्र्याचा अधिकार अशाप्रकारे हिरावून घेऊ नका. ज्या व्हॉट्स अ‍ॅप चॅटचा दावा एनसीबीने केला आहे तो कोणत्या प्रकारचा आहे, सहज केलेला चॅट आहे का हे तपासायला हवे, त्याचा वापर आता करता कामा नये असा बचाव त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT