ashish shelar 
मुंबई

पुन्हा राज्यपालांच्या भेटीगाठी सुरू; माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतली राज्यपालांची भेट

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थांना सरासरी गुण देण्याचा निर्णय सर्वसमावेशक विचार करुन झाला का? तरुणांच्या माथी "जळीत बीए" प्रमाणे "कोरोना ग्रॅज्युएट" बिरुदावली लागणार का?, पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात अशा भयगंड निर्माण केलेल्या प्रश्नांकडे माजी शिक्षणमंत्री आमदार आशिष शेलार यांनी लक्ष वेधले आहे. 

शेलार यांनी मंगळवारी राजभवनवर जाऊन कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोशारी यांची भेट घेतली. या भेटीमुळे पदवी अंतिम सत्राच्या परीक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

राज्य सरकारने पदवी अंतिम वर्षांची परिक्षा न घेता सरासरी गुण देण्याचा व गुणसुधार कार्यक्रमात ऐच्छिक जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्व विद्यार्थ्यांचा विचार करुन घेतला आहे का? राज्यातील सर्व विद्यापीठातील एटीकेटी असलेल्या 40 टक्के विद्यार्थ्यांचे काय? त्यांना प्रथम व व्दितीय वर्षात एटीकेटी असल्याने त्यांना नापास करणार का? असे प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत, असे शेलार यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. 

पुर्वी एका विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका असलेला खोलीला आग लागल्याने त्यावर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यांच्या शैक्षणिक करिअरला "जळीत बीए" अशी बिरुदावली लागली. तशी दुर्दैवाने बिरुदावली आता "कोरोना ग्रॅज्युएट" म्हणून लागणार का? विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांचा विचार होणे आवश्यक आहे. यासाठी राज्यपालांची भेट घेतल्याचे शेलार यांनी सांगितले.

"पदवी अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना विविध प्रश्नांनी घेरले असून ते आपल्या शैक्षणिक करिअरबाबत भयभीत आहेत. त्यामुळे कुलपतींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची योग्यवेळी दखल घेऊन त्यांना चिंतामुक्त करावे, अशी विनंती करण्यासाठी आपण राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना भेटलो", असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांना दिलेल्या निवेदनात शेलार यांनी विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. अनेक विद्यापीठांमध्ये पदवीचे अंतिम वर्ष हे स्पेशलायझेशनचे असते. पहिल्या व दुसऱ्या वर्षामध्ये सर्वच विषयांचा समावेश असतो. त्यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याच्या आवडीच्या विषयांतील गुणांपेक्षा पहिल्या व दुसऱ्या वर्षातील गुणांवरच पदवी दिली जाईल. हे योग्य होईल का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

काही विद्यापीठांमध्ये पहिल्या व दुसऱ्या वर्षांच्या परीक्षा महाविद्यालयस्तरावर घेतल्या जातात. अंतिम वर्षांच्या दोन सेमिस्टरच्या परीक्षा हे विद्यापीठ घेते. त्यामुळे महाविद्यालयीन परीक्षेच्या गुणांवर विद्यार्थ्याला पदवी मिळेल. तसेच पुढील शैक्षणिक वर्ष पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम कधी सुरु होणार याबाबतही सरकारने निर्णय घेतला नसल्याकडे शेलार यांनी लक्ष वेधले.

सीईटी परीक्षा रद्द करणार का ?

जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये इंजिनीयरिंग, फार्मसी व अॅ्ग्रीकल्चर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षांबाबत धोरण काय? याही प्रवेश परीक्षा रद्द करणार काय? असा सवालही उपस्थित केला आहे.

ashish shelar meets governor of maharashtra read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल समुद्रात दहशत! जीव वाचवण्यासाठी जहाजांच्या रडारवर मुस्लिम असल्याचे मेसेज; धर्म विचारुन केलं जातंय लक्ष्य

Amazon Prime Day Sale: आला रे आला अमेझॉनचा ‘प्राइम डे सेल’ आला; मध्यरात्रीच सुरू होतोय धडका, मोठी संधी चुकवू नका!

Latest Marathi News Updates: पुणे स्लीपर सेल मॉड्युल प्रकरणी अकरावी अटक

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

SCROLL FOR NEXT