nana patole  nana patole
मुंबई

हिवाळी अधिवेशाआधी पटोलेंनी गाठली दिल्ली, अध्यक्षपदासाठी खलबतं

अध्यक्षांचे नाव जाहीर होऊन पुढील दोन दिवसांत निवडणूक होऊ शकते.

सकाळ वृत्तसेवा

अध्यक्षांचे नाव जाहीर होऊन पुढील दोन दिवसांत निवडणूक होऊ शकते.

मुंबई : विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड निश्चित मानली जात असतानाच या पदासाठीच्या इच्छुकांमुळे काँग्रेस (congress) श्रेष्ठींपुढे अडचणी आल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी मंगळवारी दिल्ली गाठली. अध्यक्षपदासाठी आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte)यांच्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीसाठी पक्षाच्या आमदारांची बुधवारी सकाळी बैठक होणार असून, या बैठकीत अध्यक्षांचे नाव जाहीर होऊन पुढील दोन दिवसांत निवडणूक होऊ शकते.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी काँग्रेस आग्रही असून, त्यासाठी थोपटे यांचे नाव निश्चित केले होते. मात्र, हे पद मिळविण्यासाठी पक्षाचा एक ज्येष्ठ नेता इच्छुक असल्याने ऐनवेळी काँग्रेसच्या गोटात गोंधळ उडाल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या आमदारांची बुधवारी सकाळी बैठक बोलावण्यात आली आहे. यासाठी काँग्रेसकडून ‘व्हिप’ही जारी करण्यात आला आहे.

प्रदेशाध्यक्षांना आस महसूलमंत्रिपदाची

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मंत्रिपदाचे आश्वासन हायकमांडने दिले होते. त्यानुसार आता महसूलमंत्रीपद आपल्या नेत्याला मिळावे असा नाना पटोलेंच्या समर्थकांचा आग्रह असल्याचे बोलले जाते आहे. काही महिन्यांपूर्वी डॉ.नितीन राऊत यांचे पद पटोलेंना हवे होते असे म्हटले जात होते. आता मात्र त्यांची नजर महसूलमंत्रिपदावर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. पटोले यांच्याप्रमाणेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचेही काँग्रेस नेते राहुल गांधींशी उत्तम संबंध असल्याने त्यांचे पद जाण्याची शक्यता दुरापास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिनचा 'अजिंक्य' मानला जाणारा विक्रम मोडला जाणार? ECB चा मास्टरस्ट्रोक, Joe Root सोबत केला खास करार

Yavatmal News : शिंदेसेनेचा गड आला, पण सिंह गेला! मध्यवर्ती बँकेत शिंदेसेना ठरली युतीत ‘मोठा भाऊ’; काँग्रेसची सत्ता उलथवली, प्रतिष्ठेच्या लढतीत दिग्गजांना धक्के

Karmad News : पीएम धन-धान्य कृषी योजनेतील कामगिरीबद्दल जिल्ह्याचा दिल्लीत गौरव

Ramlila Maidan Protest: रामलीला मैदानाचं एका दिवसाचं भाडं 1 लाख 21 हजार रुपये; पण यावर्षी केवळ तीनच दिवस उपलब्ध

MPSC Student Agitation : आंदोलन थांबले, पण असंतोष कायम; ‘एमपीएससी’ अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी अपूर्णच

SCROLL FOR NEXT