Atal Setu Mumbai Traffic sakal
मुंबई

Atal Setu: सर्वसामान्यांसाठी या तारखेला सुरु होणार शिवडी-न्हावा शेवा सागरीसेतू

Chinmay Jagtap

Mumbai News: मुंबई महानगर प्रदेशाला आणि राज्याच्या विकासाला एक दिशा देणाऱ्या शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचे उदघाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी दक्षिण मुंबईतील कुलाबा ते शिवडी पर्यंतच्या परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मात्र हा पुल वाहतूकीसाठी कधी खुला होईल याची उस्तुकता वाहनचालकांना लागली आहे.अशा वेळी एक महत्वाची माहीती समोर आली आहे.

उदघाटना वेळी सकाळी पासून या भागात वाहतूकीस प्रतिबंध घालण्यात आला होता.त्यामुळे नेहमी धुळ व खड्याचे साम्राज्य असलेला मार्ग धूळ मुक्त व स्वच्छ दिसत होता. त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष या तीनही राजकीय पक्षांचे झेंडे अटलसेतूवर दुतर्फा लावून शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

बॉम्ब शोध, दंगल पथक, वाहतूक पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.एरवी फेरीवाले हा मार्ग तसेच संपूर्ण फुटपाथ व्यापून टाकतात.मात्र आज सर्व फूटपाथ मोकळे होते.या परिसरात पेट्रोलीयम कंपन्या असल्याने या मार्गावर टँकर, ट्रक, अवजड वाहनांची सातत्याने वर्दळ असते. मात्र या मार्गावर वाहने उभी कऱण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता. सागरी सेतूच्या काही तांत्रिक बाबी अपूर्ण आहेत. त्यामुळे येत्या 15 जानेवारीपर्यंत हा सागरी सेतू सुरू करण्यात येणार असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar: मास्टर-ब्लास्टरच्या घरीही गणरायाचे जल्लोषात स्वागत! कुटुंबियांच्या उपस्थिती झाली प्राणप्रतिष्ठा; पाहा Video

Heavy Rainfall Prediction: पुणे, सातारा अन् कोल्हापूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून 'ऑरेंज अलर्ट'!

Malegaon News : शेतीमध्ये अधुनिक टेक्नॉलॉजीसाठी अजित पवारांचे धोरणात्मक निर्णय

Ganpati Visarjan : पुणे महापालिकेतर्फे दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाची तयारी पूर्ण

Latest Maharashtra News Updates : नागपूरमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT