संग्रहित 
मुंबई

गोवंडीत जरा अतीच होतंय! पोलिसांवर सलग दुसरा हल्ला 

रशीद इनामदार

मानखुर्द, ता. 27 (बातमीदार) : संचारबंदीचे उल्लघंन करणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावानेच हल्ला केल्याची घटना गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात रविवारी (ता. 26) सायंकाळी घडली. यात एका पोलिस अधिकाऱ्याच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून सहा जणांना अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन पैठणकर यांनी दिली.

गेल्या आठवड्यातही लल्लुभाई वसाहतीत पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली होती. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे कोरोनाशी लढणारे योद्ध्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. 

गोवंडीच्या शिवाजी नगरमध्ये वारंवार संचारबंदीचे उल्लंघन होत आहे. पोलिसांची पाठ फिरताच शिवाजी नगरच्या विविध रस्त्यांवर बाजार भरतो व नागरिक गर्दी करतात. रविवारी सायंकाळीही परिसरातील आठव्या रस्त्यावर तसेच नव्वद फुट रस्त्यावर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यावेळी पोलिसांनी नागरिकांना आपापल्या घरी जाण्याचे आवाहन केले; मात्र गर्दीतील जमावाने चिथावणीखोर घोषणाबाजी करत पोलिसांवर दगडफेक केली. 

जमावातील एकाने लोखंडी रॉड अधिकाऱ्याच्या डोक्‍यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत अधिकाऱ्याने हाताने तो हल्ला अडवला. त्यामुळे त्यांच्या मनगटाला गंभीर इजा झाली. यावेळी पोलिसांच्या वाहनाचेदेखील नुकसान झाले. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून सहा हल्लेखोरांना अटक केली आहे. 

पोलिसांवर दुसरा हल्ला 
मानखुर्द, गोवंडी हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. येथे कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहेत; मात्र नागरिक सर्रास सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करत रस्त्यावर येत आहेत व त्यांना रोखण्यासाठी येणाऱ्या पोलिसांवरच हल्ला होत आहे. मानखुर्दमध्ये मागील दहा दिवसांत झालेला हा दुसरा हल्ला आहे. मागील आठवड्यात येथील लल्लुभाई वसाहतीमध्ये पोलिस, होमगार्ड व पालिकेच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT