मुंबई

मुंबईत कर्तव्य बजावताना आरोग्य सेविकांवर हल्ले! आरोग्य सेविका संघटनेचा दावा

समीर सुर्वे

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या "माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमे अंतर्गत मुंबईत आरोग्य सेविकांमार्फत सर्वेक्षण सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत 7 लाख घरांतील 24 लाख नागरिकांचे सर्वेक्षण पार पडले आहे. मात्र, सर्वेक्षणादरम्यान आरोग्य सेविकांवर हल्ले होत असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. मात्र, याबाबत पालिका प्रशासनाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. 

मुंबईत अनेक ठिकाणी सर्वेक्षणासाठी गेलेल्या आरोग्य सेविकांच्या पथकाला विरोध केला जात असून काही वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा आरोग्य सेविका संघटनेचे नेते प्रकाश देवदास यांनी केला. या प्रकरणात संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. या सर्वेक्षणासाठी आरोग्य सेविकांबरोबर दोन स्वयंसेवक देण्यात येणार होते. मात्र, हे स्वयंसेवकही अद्याप दिलेले नसल्याचे देवदास यांनी या पत्रात नमूद केले आहे. 

बहिष्कार मागे 
आरोग्य सेविकांना किमान वेतन मिळावे, या मागणीसाठी "माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेवर मुंबईतील आरोग्य सेविकांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र, मुखमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बहिष्कार न टाकण्याचा निर्णय आरोग्य सेविकांनी घेतला आहे, असे प्रकाश देवदास यांनी नमूद केले. कोणतीही सुट्टी न घेता आरोग्य सेविका या मोहिमेत काम करतील, असेही त्यांनी सांगितले. या मोहिमेअंतर्गत मुंबईतील 35 लाख घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यात नागरिकांचा उष्मांक आणि रक्तातील ऑक्‍सिजनची पातळी मोजली जात आहे.  

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT