online funeral 
मुंबई

व्हॉट्सऍपवर घेतले अंतिम दर्शन; अंत्यसंस्काराला जाण्याची पोलिसांनी परवानगी नाकारली

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईतील रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर 80 वर्षांच्या आईला गावी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटला नेले. नंतर लगेच लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे आईला भेटायला जाता आले नाही. त्यातच आई गेल्याची बातमी मिळाली. खूप प्रयत्न केले, पोलिसांच्या हाता-पाया पडलो; पण आईच्या अंत्यसंस्कारासाठी गावी जाता आले नाही. माझ्या हाताने अग्नी देण्याची आईची अंतिम इच्छा अपूर्ण राहिल्याची सल कायम राहील, अशी भावना पाणावलेल्या डोळ्यांनी मुंबईत नोकरी करणाऱ्या महांतेश सगुमळे यांनी व्यक्त केली. 

डोंबिवलीतील खांबालपाडा या ठिकाणी 38 वर्षीय महांतेश सगुमळे कुटुंबासह राहतात. एका खासगी कंपनीत काम करणारे महांतेश मूळचे अक्कलकोट येथील निंगदळ्ळी येथील आहेत. त्यांच्या 80 वर्षीय आई मोहनबाई तेथेच राहत होत्या. गेल्या महिन्यात गंभीर आजारी पडल्यानंतर त्यांना महांतेश यांनी मुंबईत आणून उपचार केले. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी गावी जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपले काही बरेवाईट झाल्यास तूच अग्नी दे, अशी इच्छा आईने महांतेश यांच्याकडे व्यक्त केली होती. 
आईला गावी सोडून महांतेश मुंबईत परतल्यानंतर देशभरात कोरोना संकटामुळे लॉकडाऊन सुरू झाले. काही दिवसांनी आईची प्रकृती खालावली. लॉकडाऊन संपल्यानंतर गावी जाऊन आईची विचारपूरस करू, असा विचार महांतेश यांनी केला. परंतु, प्रकृती खालावतच गेलेल्या मोहनबाई यांनी आपल्या लाडक्‍या मुलाची वाट बघत 13 एप्रिलला अखेरचा श्‍वास घेतला. महांतेश यांना पहाटे 5 वाजता ही बातमी समजली. त्यांनी सकाळी 6 वाजता डोंबिवलीतील टिळकनगर पोलिस ठाणे गाठले. आईच्या अंत्यसंस्कारासाठी अक्कलकोटला जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, पोलिसांनी त्यांना पत्र देण्यास नकार देत स्वत:च्या जबाबदारीवर गावाला जाण्यास सांगितले. 
महांतेश यांनी गावी जाण्याची तयारी केली. रस्त्यात कुणी हटकले तर? पत्नी व मुलांना क्वारंटाईन करण्यात आले तर? प्रवासात पेट्रोल नाही मिळाले तर? अनेक प्रश्‍न त्यांना सतावू लागले. त्यांनी पेट्रोलसाठी पोलिसांकडे पत्र मागितले, मात्र नकार मिळाला आणि कल्याणमधील परिमंडळ 3 कार्यालयात जाण्यास सांगितले. महांतेश धावतपळत सर्व कागदपत्रे घेऊन तेथे पोहोचले. परंतु, वरिष्ठ पोलिस अधिकारी बैठकीत असल्याने त्यांना बसण्यास सांगण्यात आले. महांतेश यांनी दीड तास वाट पाहिली; मात्र बैठक संपली नाही. तोपर्यंत सकाळचे 10 वाजून गेले होते. 

गावी मृतदेह अधिक काळ ठेवता येत नव्हता. तलाठ्याने दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार करण्यास सांगितले होते. अखेरीस महांतेश पोलिस ठाण्यातून डोंबिवलीतील घरी परत गेले. गावाकडे जाणे शक्‍य नव्हते, त्यामुळे महांतेश यांनी व्हॉट्‌सऍपवर आईचे अंतिम दर्शन घेण्याचे ठरवले. महांतेश यांनी पत्नी आणि दोन मुलांसह व्हॉट्‌सऍपवरून आईचे अंतिम दर्शन घेतले. मोहनबाईंच्या मृतदेहाला अग्नी देण्यात आला. आईची अंतिम इच्छा पूर्ण करता आली नाही, याचे दु:ख कायम राहील, असे महांतेश यांनी व्यक्त केली. 

"परवानगीसाठी कुणीही भेटले नाही' 
याबाबत पोलिसांशी संपर्क साधला असता, अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. अशी कोणतीही परवानगी पोलिस देऊ शकत नाहीत. त्यासाठी वेगळी ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी कुणीही आपल्याला भेटले नाही, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

Nalasopara News: बर्थडेचा केक खाताच ११ जणांना विषबाधा, केकमध्ये आढळलं...

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT