Atul Bhatkhalkar sakal media
मुंबई

पालिकेकडून कांदिवलीत कागदी घोडे; आमदार अतुल भातखळकर संतप्त

लोकोपयोगी कामे त्वरेने करण्याची सूचना

कृष्ण जोशी

मुंबई : कांदिवली (पूर्व) (Kandivali East) मतदारसंघात (election ward) पावसामुळे झालेली हानी (Heavy rainfall) भरून काढण्याची कामे किंवा लोकहिताची अन्य कामे, यासंदर्भात सतत पाठपुरावा करूनही महापालिका अधिकारी (bmc authorities) केवळ फाईली इकडून तिकडे पाठवीत असल्याने संतप्त झालेल्या आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आज अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

कामांसंदर्भात फक्त कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लवकरात लवकर कामे पूर्ण करा, असे निर्देशही त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रमुख समस्या आणि विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेच्या आर दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या दालनात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ही कामे फाईलीत फार काळ अडकून रहात असल्याचे दिसल्याने भातखळकर यांनी नाराजी व्यक्त केली.

महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारा बाणडोंगरी डीपी रोड किंवा आकुर्ली क्रॉस रोड, एमईएस नाला रुंदीकरण किंवा 18 जुलैच्या अतिवृष्टीमुळे घर गमावलेल्या बाधितांना पर्यायी घरे देणे अशी कांदिवली मतदारसंघातील अतिमहत्त्वाची कामे पूर्ण व्हावी याकरिता भातखळकर सतत पाठपुरावा करीत आहेत. तरीही त्यासंदर्भातील फाईली केवळ या विभागातून त्या विभागात फिरविण्याचे काम केले जात असल्याचे आज त्यांना आढळून आले. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी असा विलंब होऊ नये, अशी अपेक्षा भातखळकर यांनी यावेळी व्यक्त केली.

या अडलेल्या कामांमध्ये प्रामुख्याने पोयसर डीपी रोड, महिंद्रा कंपनीतून जाणारा डीपी रोड, लोखंडवाला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आरक्षित भूखंड हस्तांतरण, आकुर्ली रोडवरील मनपा प्रसुतीगृहाचे काम, प्रमोद महाजन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे सोयीसुविधा उभारणे, बिहारी टेकडी रस्ता, मलनिस्सारण वाहिन्यांचे रुंदीकरण, म्हाडा वसाहतीतील मलनिस्सारण वाहिन्या, पर्जन्यवाहिन्या व सिमेंट रस्त्याची कामे, पोयसर येथील रेल्वे सबवे रुंदीकरण, कांदिवलीतील विविध ठिकाणी असलेली कचरा समस्या, या आणि अशा अनेक कामांचा समावेश आहे.

यासंदर्भात यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आली. विकास कामांमध्ये दिरंगाई न करता लवकरात लवकर कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत, अन्यथा आम्हाला कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही भातखळकर यांनी दिला. यावेळी नगरसेवक शिवकुमार झा, नगरसेविका सुनिता यादव, सुरेखा पाटील, मनपा सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, भाजपा पदाधिकारी सुधीर शिंदे, संजय जैस्वाल, नितिन चौहान आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT