file photo 
मुंबई

वाहन उद्योगात मंदी; विकासाला ब्रेक...

कैलास रेडीज

मुंबई : रोकड टंचाई, वाहनकर्जाचे चढे दर, विम्याचा जादा भुर्दंड, विजेवरील मोटारींसंदर्भातील सरकारची भूमिका या सर्वांचा एकत्रित फटका बसून देशातील वाहन उद्योगाची चाके घसरणीला लागली आहेत. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत सर्वच श्रेणींच्या वाहन विक्रीत मोठी घसरण झाली असून, वितरकांकडे वाहने पडून राहत आहेत. परिणामी कंपन्यांनी उत्पादन कपातीचा मार्ग स्वीकारला आहे. एकूण देशांतर्गत उत्पादनात सात टक्के वाटा असलेल्या या उद्योगातील मंदी अशीच कायम राहिल्यास चालू वर्षात विकासदराला किमान एक टक्‍क्‍याचा फटका बसेल, अशी भीती व्यक्त होत आहे. 

जानेवारीपासून वाहन उद्योगापुढील अडचणींचा डोंगर वाढत आहे. लोकसभेच्या निवडणुका, इंधन दरवाढ, वाहन विम्याची नवीन नियमावली, कर्जदर व कर संरचनेमुळे वाहनांची झालेली दरवाढ आणि ‘एनबीएफसी’ कंपन्यांचे संकट, रोकड टंचाई यांसारख्या अडथळ्यांमुळे वाहन उद्योगाची दमछाक झाली आहे.

वाहन उत्पादकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्‍चरर्स’च्या पहिल्या तिमाहीतील ताज्या अहवालानुसार दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि व्यावसायिक वाहने या सर्वच श्रेणींतील वाहनांच्या विक्रीत घसरण झाली आहे. उर्वरित तीन तिमाहीत वाहन विक्रीत वाढ झाली नाही, तर अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे देशाच्या ‘जीडीपी’वर किमान पाऊण टक्का ते एक टक्का परिणाम होईल, असे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्‍चरर्सचे उपमहासंचालक सुगातो सेन यांनी सांगितले.

मोटारींच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने बाजारातील शिल्लक साठा वाढला असून, वितरकांसाठी आणि कंपन्यांसाठी ती नवी डोकेदुखी बनली आहे. मारुती, महिंद्रा यांसारख्या कंपन्यांनी उत्पादनात कपातीचा मार्ग पत्कारला आहे. याचा फटका कंत्राटी कामगारांना बसला आहे. या उद्योगात सुमारे पाच लाख कामगार असून, त्यांतील अनेकांच्या भवितव्याचा प्रश्‍न यातून उभा राहू शकतो.  

वाहन विक्री (एप्रिल ते जून) 

  • वाहन प्रकार     विक्री    घसरण (टक्के) 
  • प्रवासी            ७८३४००      १.९३ 
  • व्यावसायिक    २१९३८५     १०.१८ 
  • तीन चाकी       १४७६२१     ६.१९ 
  • दुचाकी            ४०५९६४७   ६.५६ 

चार महिन्यांपासून विक्रीत १५ ते १८ टक्के घसरण झाली आहे. बॅंकांकडून वाहन कर्जाची प्रक्रिया कठोर झाली आहे. कागदपत्रांची काटेकोर छाननी केली जाते. परिणामी, विक्रीत अडथळा निर्माण झाला आहे. गणेशोत्सव आणि दिवाळीत विक्री वाढेल, असे संकेत आहेत. 
- अमर सेठ, प्रमुख, शमन ग्रुप 

जानेवारीपासून विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दुचाकींच्या किमतींमध्ये १० ते २० टक्के वाढ झाल्याने मोठा परिणाम झाला आहे. आता प्रत्येकाला किमान पाच वर्षांचा विमा काढावा लागतो, त्यामुळे ग्राहकाला विम्याचा जादा खर्च पेलावा लागतो. 
- संतोष धोबी, प्रमुख, आर्यन ऑटो, माहीम 

सरकार विजेवरील मोटारी, इथेनॉलसारखी जैवइंधने, सीएनजी वाहनांना प्रोत्साहन देत आहे, त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम असून, वाहन विक्रीवर परिणाम होऊ शकतो. 
- उदय लोध, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन

वाहन उद्योगाचा जीडीपीतील हिस्सा 
वाहन उद्योगाचा ‘जीडीपी’मध्ये सात टक्के हिस्सा आहे. या क्षेत्रात वाहन उत्पादक आणि अस्सल सुटे भाग निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. सुमारे आठ लाख कोटींची उलाढाल असून साडेतीन कोटींहून अधिक रोजगार आहेत. पहिल्या तिमाहीत वाहन विक्रीत सरासरी १२ टक्के घसरण झाली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT