h
मुंबई

'या' वाहन कंपनीने भारतीय बाजारातून बंद केल्या तीन कार 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : निसान तेरॉनोनंतर आता निसान इंडिया कंपनीने आपल्या संकेतस्थळावरून आणखी तीन कार हटवल्या आहेत. संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार निसान इंडियाने मायक्रा, मायक्रा ऍक्‍टिव्ह आणि सनीला भारतीय बाजारात विक्रीसाठी बंद केले आहे. निसान आता केवळ निसान किक्‍स कॉम्पॅक्‍ट एसयूव्ही आणि जीटीआर सुपरकारची विक्री करत आहे. मायक्राला कंपनीने दहा वर्षांपूर्वी अर्थात 2010 मध्ये भारतात दाखल केले होते. तसेच सनीला त्यानंतर म्हणजेच 2011 मध्ये भारतात दाखल करण्यात आले होते. 

हेही वाचा...18 मे पासून पुढे काय? 

निसान कंपनी भारतीय बाजारात लवकरच आपली कॉम्पॅक्‍ट एसयूव्ही निसान किक्‍स नवीन बीएस 6 मानकांच्या इंजिनसह सादर करणार आहे. सध्या संकेतस्थळावर केवळ निसान किक्‍स आणि जीटीआर या दोनच कार आहेत. 
या दोन कार बंद केल्या असल्या तरी कंपनी लवकरच बीएस-6 इंजिनसह किक्‍स लॉन्च करणार आहे. यात नवीन टर्बो-पेट्रोल इंजिन असणार आहे. हे किक्‍सच्या सेगमेंटमधील सर्वात पॉवरफुल इंजिन असू शकते. याशिवाय, कंपनी नवीन सब-कॉम्पॅक्‍ट एसयूव्ही लॉन्च करण्याचीही शक्‍यता आहे. निसान मॅग्नाइट नावाने ही कार लॉन्च केली जाईल आणि याची बेसिक किंमत 5.25 लाख रुपयांच्या जवळपास असू शकते, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. 

नेमके कारण काय? 
2010 च्या दरम्यान कॉम्पॅक्‍ट सिडान सेगमेंटमध्ये मायक्राला मोठी मागणी होती. नंतर 2017 मध्ये ही कार कंपनीने काही अपडेटसह पुन्हा बाजारात उतरवली. पण आता ग्राहकांकडून कमी झालेली मागणी आणि बीएस-6 इंजिनमध्ये अपडेटसाठी लागणारा खर्च यामुळे कंपनीने दोन्ही कार बंद केल्याची शक्‍यता आहे. 1 एप्रिल 2020 पासून भारतात वाहनांच्या इंजिनसाठी बीएस 6 निकष लागू झाल्यापासून ऑटोमोबाइल कंपन्यांनी आपले अनेक मॉडेल्स बंद केले आहेत. त्यानंतर निसान कंपनीने आपल्या कार भारतीय बाजारातून बंद केल्या आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Afghanistan Floods : अफगाणिस्तानमध्ये महापूर, ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू; अनेक घरं गेली वाहून

PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

Shirpur Jain News : पार्श्वनाथच्या मंदिरात पुन्हा तुंबळ हाणामारी, दोन जण जखमी

Video: पंतप्रधान मोदींनी रॅलीदरम्यान महिलेचे केले चरण स्पर्श; कोण आहेत 80 वर्षीय पूर्णमासी जानी?

Pune Rain Updates : पुण्यात वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT