corona esakal
मुंबई

मुंबईत कोरोना रुग्णांसाठी 'ऑटोमॅटिक व्हेंटिलेटर'

मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी दिवसाला सुमारे 200 ते 250 रुग्ण सापडत आहेत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोविड रुग्णांसाठी स्वयंचलित व्हेंटिलेटर बसवण्यात येत आहेत. लोकमान्य टिळक सार्वजनिक रुग्णालयात त्यातील दोन व्हेंटिलेटर बसवण्यात आले. कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी दिवसाला सुमारे 200 ते 250 रुग्ण सापडत आहेत. 100 रुग्णांपैकी साधारणता 5 रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयात व्हेंटिलेटर सज्ज ठेवण्यात येत आहेत.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते स्वयंचलित व्हेंटिलेटरचे उदघाटन करण्यात आले. या व्हेंटिलेटर चालवण्यासाठी प्रत्येकवेळी मनुष्यबळाची आवश्यकता भासत नाही. रुग्णाच्या आवश्यकत्याप्रमाणे कार्यक्रम ठरवता येतो. रुग्णासाठी लागणाऱ्या प्राणवायूचे प्रमाण, त्याचा दाब, रुग्णाला प्राणवायू देण्यासाठी लागणारी वेळ निश्चित करता येते.

व्हेंटिलेटर मशीनला आवश्यक सूचना दिल्यानंतर ते आपले निर्धारित कार्य करते. हे गंभीर रुग्णांसाठी अतिशय उपायुक्त असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ.मोहन जोशी यांनी दिली. कोविड संसर्ग नियंत्रणात असला तरी तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी आयसीयू सज्ज ठेवण्यात येत आहेत असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

सायन रुग्णालयात कोटक महिंद्रा यांच्या सीएसआर फंडातून प्रत्येकी 18 लक्ष रुपये किंमतीचे अत्याधुनिक व्हेंटिलेटर बसवण्यात येत असुन आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने याची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे ही त्या पुढे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISRO Successfully Tests: इस्रोची गगनयान मोहिमेसाठी यशस्वी इंटिग्रेटेड एअरड्रॉप चाचणी, चिनूक हेलिकॉप्टरने पाच टनाची कुपी सोडली

Chh. Sambhajinagar: सिडको खून प्रकरण, पालकमंत्री शिरसाट माघारी फिरताच एकाचे कृत्य; प्रमोदच्या काकूला धक्काबुक्की, कानशिलात लगावली

Healthy Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा 'बटाटा मटर ब्रेड कचोरी', सोपी आहे रेसिपी

Ajit Pawar: शेतकऱ्यांनी योग्य वेळी कर्जमाफी देऊ: उपमुख्यमंत्री अजित पवार; राष्‍ट्रवादीत अनिल देसाई दाखल, साताऱ्याच्या मातीशी आपुलकीची नाळ

Heavy Rain: देशभरात मुसळधार पाऊस; २४ तासांत १२ जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी पूर

SCROLL FOR NEXT