मुंबई

Thane Politics: शिंदेंच्या आमदाराची आव्हाडांवर टिका; म्हणाले जितेंद्र आव्हाड नाही तर जितू उद्दीन मिया !

आमदार भोईर यांचा आव्हाडांवर घणाघात; इतिहासाच्या तोडमोडीचा आरोप |MLA Vishwanath Bhoir attacks MLA Jitendra Awhad

शर्मिला वाळुंज

Thane News: आव्हाड यांनी आयुष्यात कधी खरा इतिहास मांडला आहे का ? इतिहासाची तोडमोडच केली आहे. हिंदूत्व प्रेमी जनता त्यांच्या बोलण्याला विटली आहे. ते जे राजकारण करतात त्यावरुन राज्यातच नाही तर देशातील जनतेला माहित झाले आहे की हे जितेंद्र आव्हाड नाही तर जितू उद्दीन मिया आहेत. अशा शब्दांत शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जिंतेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे.

आव्हाड यांनी खासदार डॉ. शिंदे यांना इतिहासाची ओळख नसली की अशा चुका होतात असे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी कल्याण येथे केले होते. त्यावर उत्तर देताना भोईर यांनी आव्हाड यांना वरील टोला लगावला.

कल्याण लोकसभा मतदारसंघास राज्याच्या राजकारणात एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांचे या लोकसभा मतदारसंघात सतत दौरे सुरु असताना आता विरोधी पक्षाने देखील या मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच या लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला आहे.

सोमवारी शरद पवार यांच्या दौऱ्याप्रसंगी त्यांच्यासोबत पक्षाचे सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टिका केली होती.

'खासदार श्रीकांत शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख नसावी. कर्तृत्वाची ओळख नसावी. फुले, शाहू, आंबेडकरांची देखील ओळख नसेल. इतिहास माहीत नसला कि अशा चुका होत असतात, होत राहतात' असा टोला त्यांनी लगावला होता.(Maharashtra Politics)

आव्हाड यांच्या टिकेनंतर त्यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी टिकेतूनच उत्तर दिले आहे. आव्हाड यांनी आयुष्यात कधी खरा इतिहास मांडला आहे का ? असा सवाल करत ते म्हणाले, आव्हाड यांनी इतिहासाची तोडमोडच केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबदल किंवा इतर वीर पुरुषांबद्दल बोलून इतिहासाचे दाखले देखील तोडून मोडून सादरीकरण केले आहेत.

राजकारणासाठी एखाद्या धर्माविषयी, जातीविषयी ते बोलत आले आहेत. आपल्या देशाचा इतिहास जाज्वल्य आहे. त्यांनी खासदार श्रीकांत यांच्यावर बोलण्यापेक्षा मतदार संघात विकासाचे काम करावे. खासदार शिंदे यांच्याप्रमाणे काम केले तर असे काही बोलायची गरज त्यांना राहणार नाही. अशा लोकांनी न बोलेले बरे असते, पण ते बोलतात.

तसे पण त्यांना आता कोणी महत्त्व देत नाही. हिंदुत्व प्रेमी जनता त्यांच्या बोलण्याला विटली आहे. हे जितेंद्र आव्हाड नाही हा जितू उद्दीन मिया आहे असा टोला त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT