मुंबई

'ही' टेलीकॉम कंपनी भारतातून गुंडाळणार गाशा ?

सकाळ वृत्तसेवा

भारतातील मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेली व्होडाफोन भारतात गाशा गुंडाळण्याची शक्यता आहे. आर्थिक मंदीचा फटका व्होडाफोनला बसला असल्याचं समजतंय. व्होडाफोन सध्या तोट्यात असल्याची माहितीही मिळतेय. काही दिवसांपूर्वी आयडिया आणि व्होडाफोन एकत्र आल्या होत्या. दरम्यान, यासंदर्भात कंपनीकडून अद्याप काहीही स्पष्ट कऱण्यात आलेलं नाही. 

जिओ आल्यानंतर आयडिया आणि व्होडाफोन यांचं मर्जर झालं आहे. आता, या दोन्ही कंपन्या एकत्रित काम करतायत. IANS या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार व्होडाफोनने आपला गाशा गुंडाळला आहे आणि कोणत्याही क्षणी ही कंपनी भारतातून आपला पाय काढू शकते. 

सेवा देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंवर लादण्यात येणाऱ्या करांमुळे या कंपन्यांचं कंबरड मोडलंय. अशातच गेल्या काही काळात व्होडाफोनच्या  कस्टमर्सच्या संख्येतही कमालीची घट झालीये. ज्याचा मोठा फटका या कंपनीला बसलाय. व्होडाफोनची शेअर व्हॅल्यू देखील प्रचंड पडलीये. 2019 मध्ये कंपनीला 4067 करोडचं नुकसान झालंय. 2018 च्या तुलनेत हे नुकसान दुप्पट आहे. 

सुप्रीम कोर्टाने AGR निकालाअंतर्गत व्होडाफोन-आयडियाला 28,309 कोटी रुपये देण्यास सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शक्य झाल्यास कंपनी कोर्टाच्या या आदेशाच्या पुनरावलोकनासाठी अर्ज दाखल करू शकते. 

त्यामुळे तुमच्याकडे जर Vodafone चं सिम असेल तर या कंपनीच्या बाबतीतील ही बातमी तुमचा त्रास येत्या काळात वाढवू शकते. 

Webtitle : bad news for all vodafone users read full news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Bageshwar warning : ‘’.. तर या देशातील हिंदू १९९२ ची पुनरावृत्ती करण्यास तयार आहेत’’ ; बाबा बागेश्वर यांचा इशारा!

मुंबईतील चाळीत राहणाऱ्या तीन मित्रांची धमाल गोष्ट; 'गोट्या गँगस्टर'चा ट्रेलर लाँच, 'या' दिवशी होणार प्रदर्शित

Ambegaon News : बिबट्याच्या दहशतीने आंबेगाव तालुक्यातील धार्मिक-सामाजिक जीवन ठप्प; भाविकांमध्ये भीतीचे सावट!

Solapur Political : जशा निवडणूका येतील तशी पात्र आणि चित्र बदलणारी चित्राताईं- भगीरथ भालके!

Pune Crime : तरुणीने केले जिवाभावाच्या मैत्रिणीवर चाकूने वार; कोरेगाव पार्क परिसरातील घटना!

SCROLL FOR NEXT