Badlapur School Crime 
मुंबई

Badlapur School Crime: कोर्टानं कालच अटकपूर्व जामीन फेटाळला अन् आज शाळेच्या दोन्ही फरार विश्वस्तांना झाली अटक

या प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी नुकताच एन्काऊंटर केला. याच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय न्यायालयीन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Badlapur School Crime Marathi News: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या शाळेच्या विश्वस्तांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. १) नकार दिला होता. त्यानंतर आज ठाणे क्राईम ब्रान्चच्या पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दीड महिन्यापासून हे आरोपी फरार होते. यामध्ये शाळेचा अध्यक्ष आणि सचिव या दोघांचा समावेश आहे.

दोघेही फरार आरोपी अटकेत

बदलापूरच्या ज्या खासगी शाळेत दोन चार वर्षांच्या चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली होती. परंतु या घटनेची माहिती पोलिसांना तत्काळ दिली नाही, तसंच याकडं दुर्लक्ष केल्यानं शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्याविरोधात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून हे दोघेही फरार होते. मंगळवारी त्यांना कर्जत परिसरातून ताब्यात घेण्यात आलं, उद्या त्यांना कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे. Badlapur School Crime latest News

अटकपूर्व जामीन हायकोर्टानं फेटाळला

सत्र न्यायालयानं या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या अर्जावर मंगळवारी न्या. आर. एन. लढ्ढा यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी आपले अशील हे निर्दोष आहेत, त्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही; किंबहुना पीडित मुली आता ठीक असून त्यांना कोणताही त्रास नाही. पोलिसांनीही गुन्हा दाखल करण्यात वेळ घेतला. वैद्यकीय चाचण्या करण्यातही विलंब करण्यात आला, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्यावतीनं करण्यात आला होता.

घटनेची तक्रार करणं बंधनकारक

बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगितले की, आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर आहे. इतकंच काय तर आरोपी शाळेच्या व्यवस्थापनास जबाबदार आहेत. पीडित मुलींच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधल्यानंतर घटनेची तक्रार करणं बंधनकारक होतं. मात्र, त्यांनी तसं केलं नाही. न्यायालयानं हा युक्तिवाद ऐकून घेत याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला व अटकपूर्व जामिनाची याचिका फेटाळून लावली.

एन्काऊंटरच्या घटनेच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोग

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर ठाणे पोलिसांच्या निर्णयाचं समर्थन करताना महाराष्ट्र सरकारनं नुकतंच या एन्काऊंटरच्या चौकशीसाठी तीन सदस्यी न्यायालयीन आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिलीप भोसले असतील. अलाहाबाद हायकोर्टाचे ते माजी मुख्य न्यायाधीश होते. न्यायमूर्ती भोसले हे मे २०२४ मध्ये घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेच्या चौकशीच्या समितीचेही नेतृत्व करत आहेत, ज्यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

Latest Marathi News Live Update: राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती - अतुल सावे

SCROLL FOR NEXT