File Photo esakal
मुंबई

Bakri Eid Holiday: 'बकरी ईद'ची सार्वजनिक सुट्टी 28 ऐवजी 29 जूनलाच! शासनाची अधिसुचना जाहीर

आषाढी एकादशी आणि बकरी ईद अशा दोन्ही सुट्ट्या एकाच दिवशी मिळणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शासनाकडून सन २०२३ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील 'बकरी ईद'ची सार्वजनिक सुट्टी २८ जून ऐवजी २९ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं याची घोषणा केली आहे. (Bakri Eid Public Holiday will be on 29th June instead of 28th June Govt notification announced)

सुट्टीत बदल का केला?

शासनाकडून सन २०२३ या वर्षाकरिता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील 'बकरी ईद'ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, २८ जून २०२३ रोजी दर्शविण्यात आली होती. मात्र, हा सण गुरुवार, २९ जून २०२३ रोजी येत असल्यानं २८ जूनची सुट्टी रद्द करुन २९ जून रोजी जाहीर करण्यात आली आहे, अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल यांनी काढली आहे.

दरम्यान, २९ तारखेलाच आषाढी एकादशी आणि बकरी ईद दोन्ही सण आले आहेत. त्यामुळं दोन्ही सार्वजनिक सुट्ट्या एकाच दिवशी आल्यानं त्या ओव्हरलॅप झाल्या आहेत. पण शासनानं यापूर्वी २८ जून रोजी बकरी ईद आणि आषाढी एकादशी २९ तारखेला अशा सलग दोन सुट्ट्या जाहीर झाल्या होत्या. पण आता शासनानं यात बदल केल्यानं या दोन्ही सुट्ट्याच एकाच दिवशी आल्यानं एकच सार्वजनिक सुट्टी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT